Nashik News : तिच्यासाठी डॉक्टरच ठरले देवदूत! बाळ दगावले, माता सुखरूप

along with his mother, whose condition improved after treatment at the district hospital. Dr.  Rohan Borse, Dr. Medical team including Pratik Bhangre
along with his mother, whose condition improved after treatment at the district hospital. Dr. Rohan Borse, Dr. Medical team including Pratik Bhangreesakal
Updated on

Nashik News : नऊ महिन्याची गर्भवती... उच्च रक्तदाबामुळे अतिरक्तस्राव होऊ लागला. अतिशय नाजूक परिस्थितीमध्ये या गर्भवतीला नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यावेळी तिच्या जगण्या-मरण्याचा प्रश्‍न उभा राहिलेला असताना, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने तत्काळ उपचार केल्याने तिला जीवदान मिळाले. मात्र तिच्या बाळाला वाचविता न आल्याचे शल्य मातेसह तिच्यावर उपचार करणाऱ्या पथकालाही होते.

वेळीच उपचार अन्‌ अनुभवी वैद्यकीय पथकाने घेतलेल्या परिश्रमामुळे माता वाचल्याने तिच्यासह नातलगांसाठी उपचार करणारे पथक देवदूतच ठरले. (baby dead mother of palghar rescued safe in high BP case by civil hospital doctors Nashik News)

जान्हवी वाघमारे ही गर्भवती महिला मूळची केळघरची (ता. जव्हार, जि. पालघर). तिला नववा महिना सुरू असतानाच दहा-बारा दिवसांपासून तिला अचानक रक्तस्राव होऊ लागला. स्थानिक पातळीवर उपचारासाठी कुटुंबीयांनी दाखल केले परंतु, तिची प्रकृती खालावली.

त्यामुळे तिला आठ दिवसांपूर्वी अत्यंत नाजूक परिस्थितीमध्ये जान्हवीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी स्त्रीरोग व प्रसुतीतज्ज्ञ डॉ. रोहन बोरसे यांनी तिची तपासणी केली असता, तिला गर्भावस्थेमध्ये उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्याने अतिरक्तस्राव झाला होता. पोटातील गर्भही बचावण्याची शक्यता जवळपास नव्हती. याची कल्पना त्यांनी कुटुंबीयांनी दिली.

जिल्हा रुग्णालयात प्रसूती कक्षात तत्काळ जान्हवी हिच्यावर सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. अपेक्षेप्रमाणे तिच्या पोटातील गर्भ मृत झालेले होते. अतिरक्तस्रावामुळे जान्हवीच्या शरीरातील रक्त कमी झाले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्यामुळे नंतर तिला २८ पिशव्या रक्त देण्यात आले. शनिवारी (ता. २९) तिला घरी पाठविण्यात आले. जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उत्कर्ष दुधेडिया, स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. रोहन बोरसे, डॉ. योगेश चौधरी, डॉ. सुचेता गंधे, डॉ. प्रतीक भांगरे व अतिदक्षता विभागातील परिचारिकांनी परिश्रम घेतले होते.

"अत्यंत गंभीर परिस्थितीत गर्भवती माता रुग्णालयात दाखल झाल्या. त्यामुळे त्यांचा जीव वाचविणे गरजेचे होते. त्यादृष्टीकोनातून तत्काळ उपचार करण्यात आले."

- डॉ. प्रतीक भांगरे, एमडी मेडिसीन, जिल्हा रुग्णालय.

along with his mother, whose condition improved after treatment at the district hospital. Dr.  Rohan Borse, Dr. Medical team including Pratik Bhangre
Jalgaon News: बोदवड बाजार समितीत राष्ट्रवादीची सरशी! खडसेंच्या नेतृत्वातील ‘शेतकरी विकास’ला 17 जागांवर विजय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.