Bacchu Kadu News: खासदारांच्या पराभवाच्या भीतीने कांद्याची निर्यातबंदी : बच्चू कडू

Speaking at a gathering of onion and grape growers on Sunday, President of the State Committee for Divyang Welfare Bachu Kadu.
Speaking at a gathering of onion and grape growers on Sunday, President of the State Committee for Divyang Welfare Bachu Kadu.esakal
Updated on

वडनेरभैरव (ता. चांदवड) : खासदारांच्या पराभवाच्या भीतीने कांद्याची निर्यातबंदी करण्यात आल्याचा आरोप दिव्यांग कल्याण राज्य समितीचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी येथे केला.

सरकारला ठिकाणावर आणण्यासाठी मतदानातून उत्तर द्यावे, असाही इशारा त्यांनी दिला. मंजुळा मंगल कार्यालयात रविवारी (ता. १७) झालेल्या द्राक्ष व कांदा उत्पादकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. शहीद जवानाचे कुटुंबीय बाबू किसन शेळके अध्यक्षस्थानी होते. (Bacchu Kadu statement Onion export ban due to fear of defeat of MPs nashik)

प्रहार संघटनेचे जिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर, वडनेरभैरवचे सरपंच सुनील पाचोरकर, संघटनेचे तालुकाप्रमुख प्रकाश चव्हाण, येवल्याचे हरिभाऊ सोनवणे, बापूसाहेब देवरे, सुभाष पगार, भूषण पगार, सुरेश उशीर, गणेश काकुळते, एन. डी. माळी, तुषार आरोटे, अमोल फडताळे, गणेश पाचोरकर, नंदू मोहिते आदी उपस्थित होते.

भिंतीवर लिहा मतदान बंदी करू

सरकारने निर्यातबंदी केली, तर त्यांना आपण मतदान बंदी करू असे आपल्या घरांवर लिहावे. जेव्हा घरांच्या भिंती बोलतील, तेव्हा सरकारला समजेल, असे सांगून श्री. कडू म्हणाले, की नोकऱ्या आणि शेतमालाला भाव मिळाल्यास देश संपन्न होईल.

२००६ पासून स्वामीनाथन् आयोग काँग्रेसच्या सत्तेच्या काळात का लागू झाला नाही? हा खरा प्रश्‍न आहे. मी जरी सत्तेत असलो, तरी सरकारचा गुलाम नाही. मी मतदारांचा विचार करतो. ज्यांनी मला मतदान दिले आहे, त्या छोट्या घटकांसाठी मी लढतो.

या आधी कांदा महाग झाल्याने सरकार पडले. आता कांदा स्वस्त झाला म्हणून सरकार पडेल. मुळातच, कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी मरत नाही.

Speaking at a gathering of onion and grape growers on Sunday, President of the State Committee for Divyang Welfare Bachu Kadu.
Onion Export Ban : केंद्र सरकारच्या निर्यात बंदीचा परिणाम, पारोळ्यात कांदा 100ला 4 किलो

खर्चावर आधारित मदत मिळावी

श्री. पाचोरकर, वडनेरभैरवचे शेतकरी मोहिते यांनी बैलगाडी भेट म्हणून दिली. मेंढपाळांचा विषय सभागृहात मांडल्याबद्दल मुस्लीम पंच कमेटी आणि मामा पाचोरकर यांनी श्री. कडू यांचा सत्कार केला.

श्री. निंबाळकर यांनी गारपिटीने झालेल्या नुकसानीची माहिती शब्दांत मांडू शकत नाही, असे सांगत सरकारच्या नियमाने मिळणारी मदत नाकारण्याचा ठराव मांडत होणाऱ्या खर्चाच्या आधारावर मदत मिळावी अशी मागणी केली.

कांद्याच्या निर्यातबंदी केली, त्या दिवशी बंदरांवर अडकलेल्या ८०० कोटी रुपयांच्या कांद्याचे नुकसान झाले हे नुकसान व्यापारी, शेतकऱ्यांना भरून द्यावे, असेही सांगून त्यांनी ‘नाफेड' ची खरेदी व्यवस्था भ्रष्टाचाराचे कुरण असल्याचा आरोप केला.

Speaking at a gathering of onion and grape growers on Sunday, President of the State Committee for Divyang Welfare Bachu Kadu.
Onion potato Producers Union Election: बिनविरोधाची परंपरा यंदाही कायम; धनवटे, घुगेंचे वर्चस्व

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.