Bacchu Kadu News: मंदिर-मस्जिद अन्‌ भोग्यांपेक्षा जनतेचे प्रश्‍न सोडवा : कडू

Bacchu Kadu News
Bacchu Kadu Newsesakal
Updated on

येवला (जि. नाशिक) : कोणत्याही सभेने वातावरण बदलते असे नाही. तसे असते तर बाळासाहेबांच्या सभांनाही खूप गर्दी व्हायची. बदलासाठी वर्षानुवर्ष जावे लागते. जनतेची कामे करावी लागतात अन्‌ मन परिवर्तन होणे गरजेचे असते.

याची-त्याची गर्जना करून, मंदिरे, मस्जिदी बांधून, भोंगे काढून कोणाचे पोट भरले का? असा सवाल प्रहारचे संस्थापक, माजी मंत्री बच्चू कडू यांनी केला. (Bacchu Kadu statement Solve peoples problems rather than temples mosques bhonga nashik political news)

येवला दौऱ्यावर आले असताना श्री. कडू यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, ज्येष्ठ नेते छगन भुजबळांचा मतदारसंघ म्हणून येथे मेळावा वगैरे नाही. शेतकरी मोठा आहे, म्हणून पाटोदा येथे सभा घेतली.

नाशिकमध्ये राष्ट्रवादीने राजीनाम्याची मागणी केल्यासंदर्भात ते म्हणाले की, ही मूर्खता आहे, म्हणून त्यांची नेहमी सत्ता जाते. माझ्यावर दोन गुन्हे आहेत. एका गुन्ह्यात दोन वर्षे शिक्षा सुनावली असती, तर मी अपात्र ठरलो असतो.

त्यामुळे या बोलण्यात तथ्य नाही. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मालेगाव येथील सभेबाबत ते म्हणाले की, सभा घेऊन वातावरण बदलत नाही. तुम्ही शेतकरी, कार्यकर्ते, जनतेच्या संपर्कात राहिले तर फायदा होतो. सभा घेतली म्हणून लगेच लोकांनी आमदार बदलून दिला, असे होत नाही.

कांदा अनुदानाविषयी

शेतकऱ्यांना पाचशे रुपये कांदा अनुदान द्या, ही माझी मागणी आहे. कालदेखील आपण सभागृहात ही मागणी केल्याचे कडू यांनी सांगितले. सप्टेंबर-ऑक्टोबरमधील नुकसानीचे पंचनामे होऊनही येवल्यातील १६ हजार शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Bacchu Kadu News
Kalwan News: कळवण तालुक्यात नैसर्गिक शेती कार्यशाळा; शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्याचे कृषी विभागाचे आवाहन

यावर ते म्हणाले की सरकारने शेतकऱ्यांसाठी खूप काही केले असून, १२ हजार कोटींची मदत वाटली आहे. नुकसानीची मर्यादा दुपटीने वाढविली. येवल्यातील मदतीची काय अडचण आहे, हे पाहून त्यासाठी आम्ही पाठपुरावा करू, असे आश्‍वासनही त्यांनी दिले.

गर्वसे कहो हम...

प्रहार ही सामाजिक संघटना असूनही शिंदे गटासोबत गेल्याचे सामान्य जनतेला पटलेले नाही, याबाबत ते म्हणाले की, सामान्य जनतेला पटले नाही हा भागच पक्षीय आहे. मी एका शेतकऱ्याला भेटायला गेलो, तर त्यांनी मला उद्धवसाहेबांना का सोडले हा प्रश्‍न केला.

मुळात मी त्याला शेतकरी म्हणून भेटायला गेलो; पण आता हेच शेतकरी राजकारण करू लागले आहेत. शेतकऱ्यांनी गर्व से कहो हम किसान है, असे म्हटले पाहिजे. मी दिलेला पाठिंबा राजकीय विषय असून, मतदारसंघाच्या स्थानिक राजकारणाचा विचार करावा लागतो. शिंदे सरकारमध्ये पुन्हा मंत्री असाल का, या प्रश्‍नावर मात्र त्यांनी ‘मी सेवक म्हणून कायम दिसेल’ असे गुळगुळीत उत्तर दिले.

Bacchu Kadu News
Nashik News : जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये सुरगाणा ग्रामीण क्रीडा मंडळ विजेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.