Nashik News: कुठे थेंब-थेंब तर कुठे धो-धो पाणी; पंचवटीत पाणीपुरवठा विभागाचा अजब कारभार

Water Supply
Water Supplysakal
Updated on

नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही सर्वच धरणात समाधानकारक जलसाठा आहे. मात्र याही स्थितीत पंचवटीतील काही भागात नळाला करंगळी एवढी धार तर काही ठिकाणी धो-धो पाणीपुरवठा सुरू आहे.

याबाबत पाणी पुरवठा खात्याचे अधिकारी मात्र जलकुंभाचे कारण देत टाळाटाळ करत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

Water Supply
Nashik News : टरबुजाला ऐन उन्हाळ्यात कवडीमोल भाव; शेतकरी त्रस्त

धरणात समाधानकारक जलसाठा असूनही पंचवटीतील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. काही भागात अनियमित तर काही ठिकाणी अल्पवेळ पाणीपुरवठा सुरू आहे.

पंचवटीत अनेक ठिकाणी उंचसखल भाग आहे. यात उंचभागात अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू असल्याने महिलांची हंडाभर पाण्यासाठी वणवण सुरू आहे. दुसरीकडे काही ठिकाणी चक्क रस्ते, चारचाकी वाहने नळाच्या पाण्याने धुतली जात असल्याने चित्र आहे.

Water Supply
Drinking Water Crisis : 24 तासाचे सोडा, सिन्नरला 4 दिवसाआडही पाणी नाही

याबाबत पंचवटीतील पाणीपुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता उडवाउडवीचे उत्तरे दिली जात आहेत. म्हसरूळ शिवारातील किशोर सूर्यवंशी मार्गावरील अनेक ठिकाणी अवेळी व कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे.

पुष्पकनगर, एकतानगर, केतकी सोसायटी परिसरात अतिशय कमी वेळ व अल्पदाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. कलानगरच्या अनेक भागातही अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे बहुसंख्य ठिकाणी विद्युत मोटारीचा वापर केला जात आहे.

Water Supply
Nashik News : लग्नसराईने घेतला 45 दिवसांचा ‘ब्रेक’; लाखो रुपयांची उलाढाल ठप्प!

गणेशवाडीत थेंबथेंब

गणेशवाडी परिसराला लुंगे मंगल कार्यालयाजवळील पाण्याच्या टाक्यांतून पाणीपुरवठा होतो. याठिकाणी तीन टाक्या होत्या. त्यातील एकीकडून नांदूर दसक भागात तर दुसरीकडून लक्ष्मीनारायण आखाडा, तपोवन आदी भागात पाणीपुरवठा होतो, याशिवाय तिसऱ्या टाकीतून टकलेनगर, श्रीकृष्णनगर, गणेशवाडी भागात पाणीपुरवठा होतो, परंतु ही टाकी पाडून नव्याने टाकी बांधण्याचे काम सुरू आहे.

त्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे अधिकारी सांगतात. दुसरीकडे पंचवटीतील अनेक भागात चांगल्या दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. खरेतर टाकी पाडली तर पर्यायी व्यवस्था आधीच व्हायला हवी, अशी भावना त्रस्त महिलांनी व नागरिकांनी नोंदविली आहे.

Water Supply
Nashik Election: नाशिक बाजार समितीत आजी-माजी खासदार आमनेसामने? BJP अन् शिंदे गटाच्या बैठकीमुळे चर्चांना उधाण

एप्रिल-मे महिन्याचे काय

धरणात समाधानकारक पाणी असताना अशी परिस्थिती आहे, तर एप्रिल मे महिन्यात नळाला पाणी येईल की नाही, याप्रश्‍नाने येथील रहिवासी धास्तावले आहेत. कारण दोन वर्षांपूर्वी याठिकाणी चक्क टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ महापालिकेवर आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.