मुक्या प्राण्यांचा दोष तरी काय...? बेवारस गायींच्या नशिबी नरकयातना

Helpless Poor Cow
Helpless Poor Cowesakal
Updated on

अभोणा (जि. नाशिक) : गावपरिसरात गेल्या काही महिन्यांपासून बेवारस गायींची वाढती संख्या गावकऱ्यांना डोकेदुखी ठरत आहे. मात्र जवळपास दीडशे गायींच्या या मोकाट कळपाला नरकयातना सोसाव्या लागत आहेत. अनेक जण या बेवारस गायींचा कोणी वाली नाही हे बघून त्यांची तस्करी करतात. काही दिवसांपूर्वी अशाच तस्करांना पोलिसांनी अटक केली होती. मुक्या जनावरांच्या वाट्याला समंजस लोकांकडून अशी वागणूक का दिली जाते असा प्रश्न गोरक्षक उपस्थीत करतात.

मुक्या प्राण्यांचा दोष तरी काय...?

ऊन, वारा, पाऊस, थंडीत मिळेल तिथे आश्रय घेत या गायींचा कळप दारोदार शिळ्या भाकरी पोळीसाठी हंबरडा फोडत गावभर फिरत असतात. पोट भरत नाही म्हणून बाजारपट्टीत, भाजीपाला मार्केटमध्ये फेकलेला सडका भाजीपाला खाऊन तर कधी उकिर्डे धुंडाळत फिरायचं. रात्रीच्या वेळेला हमरस्ता हाच त्यांचा निवारा. अशी अवस्था या बेवारस गायींची झाली आहे. कधी वाहतुकीला अडथळा म्हणून, कधी मार्केटमध्ये शेतमालाचं नुकसान केल म्हणून तर कधी सतत दारोदार फिरल्यामुळं मिळतो तो फक्त मार!

एव्हढंच नाही तर पोट भरण्यासाठी प्लॅस्टिक पिशव्या किंवा मिळेल ते खाल्ल्यानं कुठेतरी भरवस्तीत पोट फुगल्यानं अथवा भर उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकत जीव सोडावा लागतो.

Helpless Poor Cow
बापा देखत वाहून गेलेल्या सौरभचा 2 दिवसानंतर मिळाला मृतदेह

आयत्या दुधावर डल्ला मारायला सरसावतात मालक

बेवारस कळपातली संख्या जास्त असल्याने आपापसात झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमा आयुष्यभर झेलत जीवन व्यथीत करायचं, उघड्यावरच वासराला जन्म द्यायचा आणि वासराच्या जन्माची बातमी कळली की, मालक तिची शोधाशोध करायला सरसावतो. आयतं दूध मिळणार म्हणून त्याची धावपळ सुरू होते. दोरखंडाने बांधून बळजबरीने गोठ्यावर, शेतावर आणण्याचा प्रयत्न केला जातो. सहजासहजी येत नाही म्हणून वासराला पुढे करून तर कधी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत घालून नेलं जातं. जो पर्यंत दूध मिळतं, तो पर्यंत तिला हिरवा चारा, ढेप, चूनी, न्हाऊ घालणं अशी चंगळ केली जाते; आणि एकदाका दूध आटलं की, पुन्हा तिच्या नरकयातनेला सुरुवात होते. पुन्हा रस्त्यावर, झाडाखाली, शेडमध्ये मिळेल तिथे आपल्या वासरासह गुजराण करावी लागते. जखमी गायींच्या उपचारासाठी गोरक्षक राकेश दुसाने, परेश दुसाने व डॉ. प्रवीण सिसोदिया नेहमीच तत्पर असतात. मात्र सेवा आणि उपचार हा पर्याय पुरेसा नाही. त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी अशी मागणी ग्रामस्थांची केली आहे.

Helpless Poor Cow
नाशिक : कोरोना रूग्णांना उपचाराअंती 4 लाखांचा परतावा

''ग्रामपंचायतीने ठराव करून या बेवारस गायींना पांजरापोळ मध्ये दाखल करावे. सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायतीस याबाबत सहकार्य करतील. गोवंश तस्करीला आळा बसण्यास मदत होईल.'' - चंद्रशेखर जोशी, भाजप शहराध्यक्ष, अभोणा

''रस्त्यावर बसलेल्या गायींच्या पायावरून काही निष्ठुर वाहनचालक वाहन घेऊन जातात. पाय मोडलेल्या जखमी गायींची अवस्था पाहवत नाही. आमच्यापरीने सर्व उपचार सेवा आम्ही स्वखर्चाने करतो. परंतु त्यांच्या निवाऱ्याची कायमस्वरूपी सोय झाली पाहिजे.'' - राकेश दुसाने, गोरक्षक, अभोणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()