Nashik News: सिन्नर शिर्डी महामार्गावरील वावीवेस ते खंडोबा मंदिर नाला परिसरातील ज्वालामाता लॉन्स, पंपासमोरील पदपथावर ड्रेनेज गटारीवरील झाकणे गायब झाल्याने दुर्गंधी वाढली आहे.
हा महामार्ग असल्याने एखाद्या दुचाकी तसेच पादचारी नागरिकांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Bad condition of highway on Sinnar Shirdi highway nashik news)
तसेच दुभाजकांवर मोठ्या प्रमाणावर झाडे-झुडपे वाढली आहेत. तर, काही ठिकाणी गटारांची झाकणे गायब झाली आहेत. या प्रकारामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित प्रशासनाने त्वरित या गटारीवरील झाकणे तसेच दुभाजकावरील अस्ताव्यस्त वाढलेली गवत व झाडे यावर लवकरात लवकर कारवाई करावी नाहीतर यावर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते शेखर गोळेसर, तसेच एमजी नगर येथील व मुक्तेश्वर नगर येथील नागरिकांनी केला आहे.
रस्त्याच्या शेजारी अनेक नागरिक वस्ती असून या रस्त्यावर मंगल कार्यालय तसेच उद्योग क्षेत्रातील अनेक दुकाने व पंपदेखील आहे. हा रस्ता सिन्नर शिर्डी महामार्ग असल्याने या रस्त्याने भरधाव वेगाने वाहतूक सुरू असते. तसेच दरवर्षी साई भक्त शिर्डीच्या दर्शनासाठी याच सिन्नर शहरातून जात असतात व साई भक्त व पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथ बांधण्यात आलेले आहेत.
मात्र, या पदपथांवर काही ठिकाणी झाडे-झुडपे वाढलेली आहेत. त्यातच हे पदपथ जुने झाले असल्याने त्याखालील गटारांवरील झाकणेही गायब झाली आहेत. त्यामुळे, पादचाऱ्यांना पदपथावरून चालताना अडचणी येत आहेत. त्यामुळे, ही झाडे- झुडपे काढावीत आणि गटारांवर झाकणे बसविण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते शेखर गोळेसर व अनेक नगरातील नागरिकांनी केली आहे.
उघड्या गटारीवरील दुर्गंधीच्या वासामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
येथील काही गटारीवरील झाकणे तुटल्याने यामधून दुर्गंधी वास येत असून अनेक घातक विषारी प्राणीदेखील या गटारीमध्ये फिरताना दिसत आहे . अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच रस्त्याच्या शेजारीच अनेक नगरे असल्याने. या उघड्या गटारी मधून सकाळी व सायंकाळी अनेक प्रकारचा उग्र वास येत असल्याने डासांची उत्पत्ती निर्माण झाली आहे. व नागरिकांच्या आरोग्य धोक्यात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.