Nashik News : इगतपुरी बस स्थानकाची दुरवस्था; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

The plight of the bus station
The plight of the bus stationesakal
Updated on

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : इगतपुरी तालुका हा आदिवासी तालुका असून सरकारच्या विविध योजना राबविल्या जातात. मात्र याच तालुक्याचे मुख्य एसटी बस आगाराची दुरवस्था झाली आहे.

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, शौचालय आहे पण पाणीच नाही, बस स्थानकात बसण्याची बैठक व्यवस्था नाही अशा समस्यांनी वेढलेल्या बस स्थानकासाठी सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. (Bad condition of Igatpuri bus station Ignorance of peoples representatives Nashik News)

एकीकडे सराकरने महिलांसाठी प्रवासात ५० टक्के सूट दिली असली तरी महिलांसाठी बस स्थानकात कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसल्यामुळे या योजनेकडे महिला वर्गाने पाठ फिरवली आहे. एकेकाळी याच बस स्थानकात अनेक सुविधा उपलब्ध होत्या.

खाद्यपदार्थांचे स्टॉल, खानावळ, पेपरस्टॉल, पाणपोई, लांब पल्ल्याच्या बसेस व नाशिकहून येणाऱ्या रात्रीच्या सर्व बस रेल्वेस्टेशन, तीनलकडी व जोगेश्वरी पर्यंत येत असल्याने महिला, महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्रवाशांचा प्रवास सुखकर होत होता. बसस्थानकाचा सिन्नर बसस्थानकाप्रमाणे विकास व्हावा अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे.

‘दे धक्का’ करण्याची वेळ

तालुक्याच्या ग्रामीण भागात वेळेवर बस येत नाही अनेक फेऱ्या रद्द केल्याने ज्येष्ठ नागरिकांना कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी येता येत नसल्याने त्यांनाही ५० टक्के किंवा मोफत सवलत योजनेचा लाभ मिळत नाही. तर अनेक बसेस जुन्या असल्याने खेड्यापाड्यात त्यांना ‘दे धक्का’ करण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

The plight of the bus station
Market Committee Election : मालेगाव बाजार समितीसाठी 47 अर्ज दाखल; भुसे, हिरे पॅनलमध्ये सरळ लढत

प्रवासी शोधतात पर्याय

सध्या लांब पल्ल्याच्या बसेस बस स्थानकात येत नाही. मुंबईहून किंवा नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या सर्वच बस इगतपुरी आगारात न येता महामार्गावरून थेट गावाबाहेरून निघून जात असल्याने अनेक प्रवाशांची कुचंबणा होत आहे. यामुळे प्रवाशांना पर्यायी म्हणून रेल्वे किंवा टॅक्सीने जावे लागते. यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होत आहे.

"नाशिकहून दुपारी इगतपुरीला येण्यासाठी मोजक्याच बसेस आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. आगार प्रमुखांनी नाशिक-इगतपुरी-नाशिक अशा एसटी बसची वाढ करावी. तसेच, रात्री येणाऱ्या सर्व बस जोगेश्वरीपर्यंत कराव्यात."- संदेश जाधव, विद्यार्थी.

"या आगाराचे नूतनीकरण, सुशोभीकरण करावे, सिटीलींकने इगतपुरीपर्यंत बस चालू करावी. यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे. शहरातील रस्त्याचे नूतनीकरण हे पावसाळ्यापूर्वीच करावे. केवळ फलक लावून विकास झाला असे दर्शवू नये." - रमेश शिंदे, ज्येष्ठ नागरिक.

The plight of the bus station
Deola Market Committee Election : निवडणूक बिनविरोध होणार की चुरशीची? 51 उमेदवारी अर्ज दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.