Nashik News : मालेगावातील उद्याने भकास, बालके उदास! सोयगावातील उद्यानांची दुरवस्था

The disrepair of the park in Vitthal Nagar area here.
The disrepair of the park in Vitthal Nagar area here.esakal
Updated on

Nashik News : उन्हाळी सुटी आणि बच्चे कंपनीची धमाल हे समीकरणच आहे. मात्र, मुलांना खेळण्यासाठी शहरातील उद्याने असून नसल्यासारखी झाली आहेत. शहरातील सर्वच उद्याने भकास झाल्याने मुलांचा हिरमोड झाला आहे.

त्यामुळे आम्ही खेळायचे कुठे, असा प्रश्न या मुलांना पडला आहे. शहरात मोजकी उद्याने नागरिकांसाठी खुली असली तरी त्यात तुटलेली खेळणी आणि अस्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे मालेगाव महापालिकेचे सोईस्कररीत्या दुर्लक्ष होत आहे. (Bad condition of parks in Soygaon Nashik News)

अबाल वृद्धांना निवांतक्षणी आनंद घेण्याचे, रणरणत्या उन्हात सावलीचा आल्हाद देणारे आणि पहाटे मोकळी व शुद्ध हवा मिळण्याचे ठिकाण म्हणजे उद्याने. पण, सोयगाव परिसरातील एकही उद्यान सद्यःस्थितीत सुस्थितीत नाही.

सिमेंटची जंगले वाढताना प्रदूषणामुळे पर्यावरणाचाही ऱ्हास होत आहे. अशा वेळी हिरवळीने दिलासा देणाऱ्या उद्यानांची संख्या वाढणे किंवा आहे ती उद्याने सुस्थितीत असणे गरजेचे आहे. मात्र, महापालिकेचे बहुतांश उद्यानाकडे दुर्लक्ष झाले आहे. परिसरातील मुलांनी खेळावे तरी कुठे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

सोयगाव परिसरातील मराठी शाळेमागील उद्यान, तसेच विठ्ठल नगर व पार्श्वनाथ भागातील ओसाड उद्यानात कायम दुर्गंधी असते. तेथील बाक तुटलेले, बसण्यासाठी जागा नसणे, साचलेला कचरा व वाढलेले गवत अशा भकास अवस्थेत उद्याने आहेत.

त्या अनुषंगाने उद्यानात येणाऱ्यांची संख्या दिवसागणिक रोडावत आहे. काही भागात लोकसहभागातून काही ठिकाणी मोकळी भूखंड, मंदिर तसेच उद्याने साकारली ती उद्याने सोडली तर सोयगाव परिसरात बच्चे कंपनीसाठी एकही उद्यान नाही. डी. के चौकातील उद्यान हे फक्त उन्हाळा व हिवाळ्यातच वापरात असते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

The disrepair of the park in Vitthal Nagar area here.
Nashik News : पदवीधर प्राथमिक शिक्षकांवर अन्याय; सातव्या वेतन आयोगात तफावतीमुळे नाराजी

मात्र पावसाळ्यात त्यात पाणीच पाणी असते. पाण्याअभावी उद्यानातील हिरवळही लयास गेली असून, उद्यान भकास झाले आहे. त्यामुळे महापालिकेने याकडे लक्ष देऊन उद्यानांची तत्काळ दुरुस्तही करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

"मालेगाव शहराचा हद्दवाढ होऊन आता दहा वर्षे पूर्ण झाली. मात्र सोयगावच्या नागरिकांना सुसज्ज उद्यानांची प्रतिक्षाच आहे. नावापुरते उद्याने झाली. काही उद्यानांमध्ये पाणी तर काहींमध्ये कचरा व वाढलेले गवत दिसते. लहान मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे सुसज्ज उद्यान होणे गरजेचे आहे." - दादाजी काकळीज, अध्यक्ष, आपुलकी संस्था

"उन्हाळी सुट्टी लागली असून लहान मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त जागा नाही. मुलांना रस्त्यावर खेळावे लागते. सोयगाव परिसरात एकही असे उद्यान नाही की जेथे लहान मुले किंवा वृद्ध यांना निवांत वेळ घालविता येईल. त्यामुळे सुसज्ज असे उद्यान व्हावे. तसेच जी उद्याने बकाल अवस्थेत आहेत त्यांची दुरुस्तही व्हावी."- संगीता बोरसे, स्थानिक रहिवासी

The disrepair of the park in Vitthal Nagar area here.
Onion Crisis : अवघ्या 10 दिवसांत सडला भिजलेला कांदा; JCBच्या सहाय्याने उकिरड्यात गाडण्याची वेळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.