Nashik: इगतपुरी तालुक्यात रब्बी हंगामाला ‘बुरे’ दिन! शेतातील पाण्याचा निचरा होत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मशागतीचे संकट

Stagnant water in paddy fields in the area
Stagnant water in paddy fields in the areaesakal
Updated on

इगतपुरी : तालुक्यासह त्र्यंबकेश्वर तालुक्यात मागील महिन्यात सलग चार दिवस अवकाळी पाऊस झाला. त्याचा फटका भातशेतीला मोठ्या प्रमाणात बसला. खरीप हंगामातील तयार पिके काढण्यास पावसामुळे अडथळा झाला.

जादा पावसामुळे भात शेतात अजूनही पाणी व ओलावा असल्याने त्याचा परिणाम रब्बी हंगामाच्या पेरणीवर होत आहे.

ढगाळ हवामानामुळे पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे रब्बीची पेरणी लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. तालुक्यात रब्बी हंगामाला ‘बुरे’ दिन आले आहेत. (Bad day for Rabi season in Igatpuri taluka Cultivation crisis is facing farmers no drainage of water in fields Nashik)

यंदा पावसाचे आगमन उशिराने झाले. खरीप हंगामाच्या पेरण्यांनाही जुलैनंतर वेग आला होता. भात, वरई व नागली ही पिके आता काढण्यात येत आहेत. काही पिकांची सोंगणी झाली असून, काही पिके शेतात उभी आहेत.

अवकाळी पावसाचे पाणी काही भागातील शेतात अजूनही साचले आहे. त्यामुळे पिके काढता येणे शक्य नाही. खरीपातील पिकांची काढणी होत असल्याने ‘रब्बी’च्या पेरण्या लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ‘रब्बी’च्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे.

वातावरणातील बदलानुसार तालुक्यात गहू, हरभऱ्यासह इतर पिकांच्या पेरणीला सुरवात होणे आवश्यक होते. गव्हाची पेरणी थोडी उशिराने केली, तरी चालणार आहे. पेरण्यांसाठी आधी शेत तयार करावे लागणार असून, त्यासाठी खरिपाची पिके काढणे आवश्यक आहे.

Stagnant water in paddy fields in the area
Nashik News: नंदिनी नदीच्या पूररेषेत बदल, शेतकरी संतप्त!

मात्र, ही पिके शेतात उभी असल्याने शेत तयार करणार कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. वाफसा तयार होत नाही, तोपर्यंत पेरणी करता येणार नाही.

येत्या आठ ते दहा दिवसांत चांगले ऊन पडले, तर वाफसा होणार आहे. ही परिस्थिती पाहता रब्बीसाठी शेतकऱ्यांना तूर्ततरी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

"अवकाळी पावसाने भातशेतीला मोठा फटका बसला आहे. खरीप हंगामात खते, बी-बियाणे, मजुरी, औषध, वीजबील, फवारणी यावर मोठा खर्च झाला आहे. शेतातील पावसाचे पाणी अजून कमी झालेले नाही. त्यामुळे महिनाभर शेतात रब्बी पिकांची पेरणी करता येणार नाही."

-शांताराम शेलार, शेतकरी, त्रिंगलवाडी

Stagnant water in paddy fields in the area
Nashik Gas Cylinder Crisis: कृत्रिम टंचाईमुळे लासलगावकर ‘गॅस’वर! 8 ते 10 दिवसांपासून सिलिंडरचा कृत्रिम तुटवडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.