Nashik News: महापालिकेचा भोंगळ कारभार; जलवाहिनीची दुरुस्ती करताना हजारो लिटर पाणी वाया

Thousands of liters of water wasted while repairing the water channel in Shivamnagar
Thousands of liters of water wasted while repairing the water channel in Shivamnagaresakal
Updated on

पंचवटी : यंदा पाऊस कमी पडला असल्याने धरणातील पाणीसाठा कमी आहे. प्रशासन नागरिकांना पाणी जपून वापरण्यासाठी आवाहन करीत आहे. तर दुसरीकडे खुद्द मनपाचे कर्मचारी या आवाहनाला केराची टोपली दाखवत असल्याचे समोर आले आहे.

हिरावाडी परिसरातील शिवमनगरमध्ये पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी दुरुस्ती करताना हजारो लिटर पाणी वाया गेले. यामुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. (Bad governance of NMC Thousands of liters of water wasted while repairing water channel Nashik News)

Thousands of liters of water wasted while repairing the water channel in Shivamnagar
NMC News: विद्युत विभागालाच ‘चार्जिंग’ची आवश्‍यकता; दीड वर्षे उलटूनही ‘EV स्टेशन’ निर्मिती लांबणीवर

हिरावाडी परिसरातील शिवमनगरमध्ये मंगळवारी (ता. १९) पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिनीत बिघाड झाली. मनपा प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागाकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. सहा इंची पिण्याच्या पाण्याची ही पाइपलाइन दुरुस्ती करतेवेळी परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करणे गरजेचे होते.

मात्र दुरुस्ती करताना हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहत होते. हे पाणी जवळील मोकळ्या जागेत साचले असल्याने डासांची पैदास होण्याची भीती नागरिकांनी वर्तविली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले तर याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Thousands of liters of water wasted while repairing the water channel in Shivamnagar
Nashik Municipality News : आरक्षण हटविण्यासाठी प्रशासन-लोकप्रतिनिधी युती; प्रशासनाकडून प्रस्ताव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.