नाशिक : रस्त्यांची लागली वाट; शेतमाल नेण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत

road-condition
road-conditionesakal
Updated on

लासलगाव (जि. नाशिक) : महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया समजल्या जाणाऱ्या सधन तालुका म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील करंजी- तारुखेडला या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून वाहन चालवणे जिकरीचे झाले आहे. बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, येथील शेतकऱ्यांना शेतमाल विकण्यासाठी निफाड, लासलगाव येथे येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

वाहनांचा होतोय खुळखुळा

तारुखेडला रस्त्यांची गेल्या काही महिन्यापासून दयनीय दुर्दशा झाली आहे. या रस्त्यांवर ऐन वर्दळीच्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधून वाहन उसळून अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. रस्त्याने जाणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांची चाके या खड्ड्यात आदळून वाहनांचा खुळखुळा होत आहे. सोबतच वाहनावर बसलेल्यांनाही पाठीच्या दुखण्याला सामोरे जावे लागत आहे.

road-condition
टोल नाक्यावर अजब प्रकार! Fastag बंदच्या नावखाली होेतेय लूट

या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना, तसेच इतर वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावर कित्येक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणाहून वाहने चालविणे अत्यंत कठीण झाले आहे. या रस्त्यावर मोठेमोठे खड्डे पडले असून, एका खड्याला चुकवायला गेले, तर दुसरे खड्डे स्वागतासाठी तयार आहे, अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे. लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.

''या रस्त्याने जाणे म्हणजे जीवाची हमी नाही. कधी अपघात घडेल सांगता येत नाही. शेतमाल ने-आण करण्यासाठी नेहमी वापरला जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सदन तालुका म्हणून ओळख असलेल्या या भागातील रस्त्याची अवस्था पाहून वाईट वाटते. या रस्त्याचे टेंडर निघूनही कामास सुरवात झालेली नाही.'' - गोरख अडसरे, सरपंच, करंजी

road-condition
नाशिक : भाजपचा फटाका, आयुक्त ठरवणार फुसका!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.