Nashik Crime: पुजाऱ्यानेच लांबविली 4 लाखांची रोकड असलेली बॅग; रविवार कारंजा येथील भरदिवसा घडलेली घटना

crime
crimeesakal
Updated on

Nashik Crime : धार्मिक पूजाविधीसाठी ठाण्यावरून नाशिकला आलेल्या एकाकडील चार लाखांची रोकड असलेली बॅगच संशयित पुजार्याने लांबविल्याचा प्रकार रविवार कारंजा परिसरात भरदिवसा घडला.

याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी सुरू आहेत. तसेच बॅग घेऊन पसार झालेल्या पुजाऱ्य़ाचाही पोलीस शोध घेत आहेत. (bag containing 4 lakh cash handed over by priest incident at ravivar Karanja in Nashik Crime)

गिरीश नंदराम महाबरे (रा. वांगणी, ता. अंबरनाथ, जि. ठाणे) यांच्या फिर्यादीनुसार, ते काही धार्मिक पूजा विधी करण्यासाठी गेल्या शुक्रवारी (ता. ७) नाशिकला आले होते. त्यांच्यासमवेत पुजारी विनोद धारड व जव्हार येथील एक बुलेटस्वारही होता.

संशयित पुजारी धारड व गिरीश महाबरे हे चारचाकी वाहनातून नाशिकला आले. महाबरे यांनी पूजेचे साहित्य आणलेले असतानाही आणखी काही पूजेचे साहित्य घेण्यासाठी ते रविवार कारंजा परिसरात आले. यावेळी महाबरे यांच्याकडे असलेल्या बॅगेत चार लाख रुपयांची रोकड असल्याची माहिती पुजारी धारड याला होती.

महाबरे हे पुजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी रविवार कारंजा परिसरातील शनि मंदिराजवळ कारमधून उतरले. त्यावेळी पुजारी कारमध्येच बसून होता. महाबरे हे पूजेचे साहित्य खरेदी करीत असतानाच, पुजार्याने महाबरे यांची बॅग घेत कारसह पोबारा केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

crime
Pune Crime News : पुणे हादरलं! सुप्रिया सुळेंच्या निकटवर्तीय माजी नगरसेवकाची कोयता-कुऱ्हाडीने हत्या

तर, त्यावेळी बुलेटवर (एमएच १५ एफएस ९३१९) असलेल्या संशयितानेही मागच्या मागे पलायन केले. महाबरे यांनी मागे वळून पाहता कार त्यांना जाताना दिसली. ते कारच्या मागे काही अंतर धावलेही परंतु पुजारी पसार झाला.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. त्यानुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संशयित बुलेटस्वाराला ताब्यात घेतल्याचे समजते. त्याच्याकडे याप्रकरणी चौकशी सुरू आहे.

crime
Sambhajinagar Crime : वाहनाला हुलकावणी दिल्याच्या कारणावरून वाद; हल्ल्यात जखमी शेतकऱ्याचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.