Nashik BJP News : भाजपची धुरा पुन्हा जुन्या जाणत्यांकडेच; बागलाण तालुका भाजपची कार्यकारिणी जाहीर

 BJP
BJPesakal
Updated on

Nashik BJP News : बागलाण तालुका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीची घोषणा करताना पक्षाने १९८० च्या दशकापासून भाजपचे निष्ठेने काम करणाऱ्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांवर पुन्हा एकदा पक्षाची धुरा सोपवली आहे. (Baglan Taluka BJP executive announced nashik news)

पक्षाचे ज्येष्ठ नेते व सटाणा पालिकेचे माजी नगरसेवक साहेबराव रामचंद्र सोनवणे यांची नाशिक जिल्हा सरचिटणीसपदी तर समको बँकेचे माजी अध्यक्ष, सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रमेश संभाजी देवरे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी तर डॉक्टर विलास बच्छाव यांची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी तर मंगेश खैरनार याची भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी ( मालेगाव) नियुक्ती झाली आहे.

तालुकाध्यक्ष संजय (माऊली) देवरे रा.लखमापूर यांची बागलाण तालुका मंडल अध्यक्षपदी, सटाणा शहराध्यक्ष राहुल केदा सोनवणे यांची सटाणा शहर मंडल अध्यक्ष पदी फेरनियुक्ती करून पुन्हा कामकाज करण्याची संधी दिली आहे.

 BJP
Anil Kadam Sharad Pawar : अनिल कदम शरद पवारांच्या भेटीला; आमदार बनकरांच्या अडचणी वाढणार?

बऱ्याच दिवसांपासून या नियुक्त्यांकडे तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांचे लक्ष लागून होते. पक्षश्रेष्ठींनी जिल्हा कार्यकारणीवर जुन्या फळीतल्या निष्ठावान कार्यकर्त्यांची वर्णी लावल्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. नवीन नेमणुकांमध्ये धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व बागलाण आमदार दिलीप बोरसे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची वर्णी लागल्याचे चित्र आहे.

गेल्या सात वर्षांपूर्वी सटाणा नगरपालिकेवर अपक्ष म्हणून निवडून आलेले माजी थेट नगराध्यक्ष सुनील मोरे यांनीही सहा महिन्यांपूर्वी भाजपात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचेही तालुक्यावर वर्चस्व आहे. आगामी सटाणा नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे भाजपाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.

 BJP
Nashik Police Bharti : दिंडोरी, पेठमध्ये पोलिस पाटील आरक्षण जाहीर; 116 रिक्त पदांवर भरती प्रकिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.