Nashik Political : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिक रोडच्या हॉटेल ग्रेपसिटीमध्ये झालेल्या ‘इंडिया आघाडी’च्या बैठकीपासून बहुजन वंचित आघाडीने अंतर ठेवल्याने राजकीय वर्तुळात त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
लोकसभा निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नसल्या तरी महायुती तसेच ‘इंडिया आघाडी’च्या घटक पक्षांच्या बैठकांना जोर आला आहे. (Bahujan Vanchit Aghadi keep distance it is being heavily discussed in political circles nashik news)
वंचित बहुजन आघाडीला ‘इंडिया आघाडी’त स्थान मिळाले असल्याने या पक्षाची ताकद किती आहे, याची प्रचीती त्यावरून येते. त्यामुळेच युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर आल्याने त्याचेच औचित्य साधत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यासाठी नाशिक रोडच्या हॉटेल ग्रेपसिटीमध्ये आघाडीच्या घटक पक्षांची बैठक झाली.
या बैठकीचे निमंत्रण वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनाही पाठविण्यात आले होते. मात्र वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी या बैठकीपासून अंतर ठेवण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नाशिकमधून उभे राहिलेले बहुजन वंचित आघाडीचे पवन पवार यांनी एक लाखाहून अधिक मते मिळवली होती.
त्यावरूनच या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे प्राबल्य असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळेच मतविभागणी टाळण्यासाठीच वंचित बहुजन आघाडीला या आघाडीत सहभागी करून घेणे अन्य घटक पक्षांना क्रमप्राप्त झाले, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. मात्र असे असतानाही आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या नाशिक रोड येथील बैठकीपासून वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी अंतर ठेवल्याने त्याची चर्चा न झाली तर नवलच.
या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे महानगराध्यक्ष अविनाश शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता पक्षश्रेष्ठींकडून आम्हाला बैठकीत उपस्थित राहण्यासंदर्भात काही स्पष्ट आदेश नसल्याने आम्ही या बैठकीपासून दूर राहिलो, असे स्पष्टीकरण जिल्हाध्यक्ष पवन पवार, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष वामन गायकवाड, महानगर महासचिव संजय साबळे, संदीप काकडीच, सचिव बजरंग शिंदे यांनी दिले. वरिष्ठ पातळीवर ठोस निर्णय होईपर्यंत आम्ही अशा बैठकांना उपस्थित राहणार नाही, असेही शिंदे यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.