Nashik News : अंगावर ऊन झेलत बहुरूपींना भरावी लागतेय पोटाची खळगी!

Multi-faceted Dada Chavan in the guise of a police sub-inspector, creating public awareness and entertaining people
Multi-faceted Dada Chavan in the guise of a police sub-inspector, creating public awareness and entertaining peopleesakal
Updated on

नरकोळ (जि. नाशिक) : पोटाची खळगी भरण्यासाठी संत-महात्मे, पोलिस आणि देवाचेही रूप घेतले. परंतु पोटाची समस्या मार्गी लागलेली नाही. भर उन्हात पोटाची खळगी भरण्यासाठी फिरावे लागते. (Bahurupi have to walk in heat for money nashik news)

शेतकऱ्यांच्या शेतातच पिकत नाही आम्हाला कोठून देणार असे ठेंगोडा (ता. बागलाण) येथील युवा बहुरूपी दादा रघुनाथ चव्हाण यांनी आपली यथा मांडली. नरकोळ (ता. बागलाण) येथे फौजदारी वेशात येऊन पोटासाठी नवनवीन चुटकुले सांगून लोकांची करमणूक करत होते.

गावोगावी हिंडून दोन पैसे व मिळेल त्या धान्यवर दिवसभर फिरून रोज घरी जातो आणि उपजीविका भागवीतो. दुसरा दिवस उजाडला की तिचं तऱ्हा सुरु होते. शासनाकडून मानधन रूपात काही मिळेल अशी अपेक्षा आहे. दोन वर्षे कोरोनामुळे हलाखीचे गेले. शहारात गेल्यास दुकानदारांकडून प्रतिसाद मिळत नाही.

ग्रामीण भागात तर शेतकरी विकत धान्य घेतो. आम्हाला काय मिळणार मिळाले तर अनेक बोलणे ऐकण्यास मिळतात. वडिलोपार्जित व्यवसाय असल्यामुळे करावा लागत आहे. शेती नसल्यामुळे या व्यवसायशिवाय आता पर्याय नाही. मी माझ्या मुलांना सांगतो शिकून मोठे व्हायचे नोकरी लागायची परंतु हा व्यवसाय करायचा नाही.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

Multi-faceted Dada Chavan in the guise of a police sub-inspector, creating public awareness and entertaining people
Unseasonal Rain : आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल; सुरगाणा तालुक्यात अवकाळीमुळे चिंता!

पूर्वीच्या काळी जेव्हा गाव-वस्त्यांवर करमणुकीचे पर्याय मर्यादित होते, तेव्हा बहुरूपी कलाकार कुणाची तरी हुबेहूब नक्कल करून लोकांचे मनोरंजन करत असत. हे बहुरूपी प्रामुख्याने फौजदार, हनुमान, शंकर यांचे वेश धारण करून गावभर फिरत. ती रूपे पाहून गावातील लोक त्यांना धान्य, पैसे वगैरे देत. परंतु आता चित्रपट गृह आणि करमणुकीची साधने वाढल्याने आणि नविन पिढीला या गोष्टीची माहिती नसल्याने तसेच या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

"बहुरूपी हा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. शेती नसल्यामुळे मिळेल त्या धान्य रक्कमेवर कुटुंब चालवीत असून आता दिवसेंदिवस उतरती कळा व्यवसायावर येत आहे. परंतु याशिवाय पर्याय नसल्याने रोजचा दिनक्रम सुरू होतो." - दादा चव्हाण, बहुरुपी ठेंगोडा, ता.सटाणा

Multi-faceted Dada Chavan in the guise of a police sub-inspector, creating public awareness and entertaining people
Nashik News : पाटबंधारे सेवक पतसंस्थेत 42 लाखांचा अपहार; व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()