नाशिक : लाच लूचपत प्रतिबंध विभागाच्या कारवाईनंतर गुंगारा देण्यात यशस्वी ठरलेल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीर ( Vaishali Veer-Jhankar) यांच्यावतीने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज सादर करण्यात आला आहे. या अर्जावर उद्या (शुक्रवारी) सुनावणी होणार आहे.
शिक्षण संस्थेच्या प्रशासकीय कामाच्या मंजुरीसाठी नऊ लाखांच्या लाचेची मागणी करून आठ लाखांची लाच स्विकारण्याचा श्रीमती झनकर यांच्यावर आरोप आहे. झनकर यांच्यासह प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते आणि शासकीय वाहनचालक ज्ञानेश्वर येवले यांचा यात समावेश होता. या दोघांना लाच लूचपत प्रतिबंध विभागाने अटक केली असून न्यायालयाने १३ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. पोलिसांना बुधवार सकाळपासून गुंगारा देत फरार असलेल्या श्रीमती वीर यांच्या चौकशीसाठी त्यांच्या मागावर तीन पथके रवाना केली. हा तपास सुरु असताना गुरूवारी (ता. १२) ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. अविनाश भिडे यांच्यातर्फे जिल्हा व सत्र न्यायालयात वीर- झनकर यांनी अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला. या अर्जावर शुक्रवारी (ता.१३) सुनावणी होणार आहे. सुनावणीवेळी झनकर उपस्थित राहणार की नाही, हे स्पष्ट नाही. अटकपूर्व जामिनावर काय निर्णय येतो, याकडे शिक्षण विभागासह जिल्ह्यावासीयांचे लक्ष लागले आहे.
मालमत्तांची चौकशी
लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने संशयितांच्या घरांची झडती घेतली असून, यापैकी वीर यांच्या नावे वेगवेगळ्या ठिकाणी चार फ्लॅट, जमीन, कार, दुचाकी तसेच ४० हजारांची रोकड आणि काही बँकाचे पासबुक असल्याचे आढळून आले आहे. वीर यांच्या घराच्या झडतीत त्यांच्या नावे मुरबाड, कल्याण रोड येथे एक फ्लॅट, नाशिक शिवाजीनगर येथे एक फ्लॅट, सिन्नरमध्ये ०.५७ गुंठे जमीन, मिलिंदनगर, कल्याण ३१.७० गुंठे, १०.०८ गुंठे, ४०.८० आणि १३.१० गुंठे जमीन, सिन्नरमध्येच आणखीन ०.५६ गुंठे, ०१.५१ गुंठे, ०३.४१ गुंठे जमीन असून कल्याण गंधारे येथे एक फ्लॅट, नाशिक गंगापूर रस्त्यावर एक फ्लॅट, सिन्नरमध्ये ०.२२.७० गुंठे क्षेत्राची मालमत्ता, ४० हजारांची रोकड, होंडा सिटी कार, दुचाकी आणि वेगवेगळ्या बँकेचे पासबुकही मिळाले आहे.
इतर दोघांच्या मालमत्तांची चौकशी
संशयित येवले यांच्या घरझडतीत त्यांच्यासह पत्नी आणि मुलांच्या नावाने वेगवेगळ्या बँकेचे पासबुकसह दोन गाड्यांचे आरसीबुक मिळाले आहेत. दशपुते यांच्या नावे नाशिक येथे ते राहत असलेला टू बीएचकेचा फ्लॅट, दुचाकी आणि तीन बँक खाती असल्याची बाब समोर आली आहे. मालमत्तांचा शोध सुरूच असून, झनकर यांच्या अटकेनंतर आणखी काही बाबी समोर येतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. प्रमाणीत उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता असल्यास संबंधितांना या मालमत्तेचा स्त्रोतही स्पष्ट करावा लागतो, अन्यथा अपसंपदा जमा केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया एसीबीतर्फे राबविली जावू शकते.
संशियतांचीही उन्यायालयात हजेरी
वैशाली वीर यांनी नाशिक येथील एम.एच.शेख यांच्या न्यायालयात त्यांनी ॲड अविनाश भिडे यांच्या मार्फत अटक पूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला. दरम्यान, लाच लूचपत प्रतिबंध विभागातर्फे फरार वैशाली वीर यांच्या अटकपूर्व अर्जावर न्यायालयात उद्या (ता.१३) सुनावणी होणार आहे. तसेच एसीबीच्या कोठडीत असलेले इतर दोघा संशयितांची उद्या कोठडीची मुदत संपत आहे. त्यांना देखिल न्यायालयात हजर ले जाणार आहे. यावेळी तपासाच्या दृष्टीने एसीबीची काय भूमिका असेल हे उद्याच्या सुनावणीवेळीच स्पष्ट होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.