Bakri Eid 2023 : बकरी ईद 29 जूनला होणार साजरी

Bakri-Eid
Bakri-Eidesakal
Updated on

Bakri Eid 2023 : सोमवारी (ता. १९) चंद्रदर्शन घडल्याने मुस्लिम बांधवांकडून २९ जूनला बकरी ईद साजरी केली जाणार आहे. ईदच्या विविध तयारीस वेग आला आहे. सर्वत्र उत्सवाचे वातावरण आहे. (Bakri Eid will be celebrated on June 29 nashik news)

सोमवारी सायंकाळी जिल कद महिन्याची २९ तारीख होती. त्यानिमित्ताने चंद्रदर्शन होणे अपेक्षित होते. मुस्लिम बांधवांच्या नजरा आकाशाकडे लागून होत्या. सायंकाळी चंद्रदर्शन घडल्याने जिल कद महिन्याची समाप्ती होऊन जिल हज महिन्यास सुरवात झाली आहे.

२९ जूनला जिल हज महिन्याची १० येत असल्याने मुस्लिम बांधवांकडून ईद साजरी केली जाणार आहे. चाँद कमिटीमार्फत याची घोषणा करण्यात आली. शहर-ए-खतीब हिसमोद्दीन खतीब यांच्या नेतृत्वात गोल्फ क्लब येथे ईदगाह मैदानावर सकाळी १० वाजेच्या सुमारास बकरी ईदची सामुदायिक नमाज होणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Bakri-Eid
Religious unity : आषाढीनिमित्त गोदाकाठी असेही अनोखे धार्मिक ऐक्य!

महापालिका, जिल्हा तसेच पोलिस प्रशासनाकडून ईदचे नियोजन करण्यात आले आहे. ईदगाह मैदानाची स्वच्छता करत वजूहसाठी पाण्याची व्यवस्था करून देण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे.

दुसरीकडे ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होताना दिसत आहे. बोकड बाजार सजण्यास सुरवात झाली आहे. अनेकांनी काही महिन्यांपूर्वीच कुर्बानीसाठी बोकड खरेदी करून ठेवले आहेत.

त्याचप्रमाणे महापालिकेकडूनही कुर्बानीसाठी व्यवस्था करून देण्यासाठी कत्तलखान्यांची व्यवस्था केली आहे. त्याच ठिकाणी कुर्बानी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Bakri-Eid
Ashadi Ekadashi And Bakri Eid | आषाढी एकादशी आणि बकरी ईदनिम्मित मुस्लिम बांधवांकडून खिचडीचं वाटप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()