येवला (जि. नाशिक) : मागील ३५० वर्षांपासून विजयादशमीला सामुदायिक सीमोल्लंघनाच्या अनोखी परंपरा उत्सवप्रिय येवलेकरांनी जपली आहे. यावर्षीही येथील गंगादरवाजा येथे हजारों नागरिकांनी एकत्र येत सामुदायिक सीमोल्लंघन केले. प्रत्येक सण आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची परंपरा या शहराने जपली आहे. दसऱ्यालाही महाराष्ट्रात कोठेही नाही अशा अनोख्या परंपरेतून प्रत्येक समाज आपला समूह करून सीमोल्लंघन करतात.
या परंपरेनुसार बुधवारी सायंकाळी सबंध शहर अन आख्खा परिवार एकवटला अन सायंकाळी सहानंतर गंगादरवाजा भागात जमू लागले. याच परिसरातील गंगावेशीतून भैरवनाथ मंदिर परिसरात नागरिक जमले होते. लेवा पाटीदार समाज येथील स्वामी मुक्तानंद - एंझोकेम विद्यालयाच्या प्रांगणात एकत्रित येऊन सिमोल्लंघन करतात. यानुसार बुधवारी प्रत्येकाने आपल्या कुटुंबासह सीमोलंघन केले. ब्रह्मवृन्दाच्या मंत्रघोषात प्रत्येकाणे विधीपूर्वक शमी पूजन केले. (Balaji Rathotsav started 350 years of tradition in yeola Nashik Latest Marathi News)
नवरात्रोत्सवात नऊ दिवस देवघरात बसवलेल्या घटात उगवलेले धान प्रत्येक व्यक्ती बरोबर घेवून शमिला वाहिले.या परिसरात विविध समाज बांधवांच्या सतरंज्या अंथरल्या जावून प्रत्येकजन आपआपसात प्रेमपूर्वक चौकशी करून केळीचा प्रसाद वाटतो. नंतर आपापल्या घरी जावून सौभाग्यवतीकडून औक्षण करून घेतो. लहान मंडळींनी वडीलधाऱ्यांकडे जावून सोनं (आपट्याची पानं ) देत आशीर्वाद घेतले.
गंगादरवाजा भागात सिमोल्लंघनासाठी जमलेल्या येवलेकरांच्या गर्दीने जणू यात्रेचे स्वरूप आले होते. प्रत्येकाने देवाला सोने देत या ठिकाणी सीमोल्लंघनाचा आनंद घेतला.शहरात चौकाचौकात युवकांचे थवे उभे राहून सोनं वाटत होते. ही परंपरा आजही पाळली जाते. विविध मंदिरे तसेच मित्र आप्तेष्टांच्या घरी जाऊन एकमेकांना सोने वाटून येवले करांनी दसऱ्याचा आनंद घेतला.
बालाजी रथाची मिरवणूक
दसऱ्याचे खास वैशिष्ठ्य म्हणजे भगवान बालाजीचा रथ १० दिवस वेगवेगळया वाहनावर स्वार होवून शहरात फिरतो. भाविक या रथाला आपल्या घरी निमंत्रित करतात. दसऱ्याच्या दिवशी बालाजी घोड्यावर बसून नागरिकांसमवेत सीमोल्लंघन करतात. रथाचे सारथी व सोबत आलेले भाविक यांना कानगी दिली जाते. एकादशीला अर्थात दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी हा रथ शहरापासून तीन किमीवरील नागडे गावात नेला जातो. नदीत बालाजीला स्नान घातले जाते व नागडे ग्रामस्थ बालाजीचे दर्शन घेतात व रथ पुन्हा येवल्यात येतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.