Goda Mahaarti : पुरोहित संघाच्या आधिपत्याखालीच व्हावी गोदा महाआरती : बाळासाहेब सानप

गंगा गोदावरी पुरोहित संघाच्या आधिपत्याखालीच आजवरचे कुंभमेळे व अन्य मोठे धार्मिक कार्यक्रम झाले.
Waiting for Mahaarti at godavari river artical nashik
Waiting for Mahaarti at godavari river artical nashikesakal
Updated on

Goda Mahaarti : गंगा गोदावरी पुरोहित संघाच्या आधिपत्याखालीच आजवरचे कुंभमेळे व अन्य मोठे धार्मिक कार्यक्रम झाले. वर्षानुवर्षे गोदाघाटावरील रामतीर्थावर काम करणाऱ्या गंगा गोदावरी पुरोहित संघाच्या नेतृत्वातच गोदावरीची महाआरती व्हावी, अशी अपेक्षा नाशिक पूर्वचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी व्यक्त केली.

याबाबत लवकरच पंचवटीकरांसोबत ग्रामसभेचे आयोजन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (Balasaheb Sanap statement on God Maha Aarti should be done under leadership of Purohit Sangh nashik news)

गोदावरीच्या प्रस्तावित महाआरतीला १९ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. मात्र ही आरती सुरू होण्यापूर्वीच नेतृत्वावरून वाद उभा ठाकला आहे. त्यामुळे ही आरती रामतीर्थ सेवा समिती की गंगा गोदावरी पुरोहित संघ करणार याबाबत संभ्रम असतानाच नाशिक पूर्वचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी या वादात उडी घेत गंगा गोदावरी पुरोहित संघाच्या नेतृत्वातच ही महाआरती व्हावी, अशी भूमिका मांडली.

गंगा गोदावरी पुरोहित संघाकडून अनेक कुंभमेळ्यांसह मोठे धार्मिक विधी पार पडले. गत महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गोदापूजनावेळीही पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनीच पौरोहित्य केले, मग असे असताना नव्याने रामतीर्थ सेवा समिती कुठून आली, असा प्रश्‍न सानप यांनी विचारला.

Waiting for Mahaarti at godavari river artical nashik
Namami Goda Project: ‘नमामि गोदा’ प्रकल्पासाठी सुधारित आराखडा; नदी संवर्धन योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे नियोजन

याबाबत पंचवटीतील जागरूक नागरिक, विविध आखाड्यांचे महंत, साधुसंत यांची ग्रामसभा आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत भक्तीचरणदास यांनीही सानप यांच्या मताशी सहमती दर्शवीत ग्रामसभेचे आयोजन करण्याबाबत सूतोवाच केले. महाआरतीसाठी दोन गट निर्माण झाल्याने पुढील काळात हा वाद अधिकच चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

''शहरासह देशभरातील भाविकांच्या पूर्वजांच्या चोपड्या जतन करण्याचे व सांभाळण्याचे काम पुरोहित संघ करत आहे. याशिवाय त्यांच्याकडे अनेक कुंभमेळे यशस्वी केल्याचा अनुभव आहे. त्यामुळे महाआरतीही त्यांच्याच नेतृत्वात व्हावी.''- बाळासाहेब सानप, माजी आमदार

Waiting for Mahaarti at godavari river artical nashik
Goda Mahotsav : गोदा महोत्सवाचे मंगळवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()