Balasaheb Thackeray Apla Dawakhana: महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘आपला दवाखाना’चे लोकार्पण

Balasaheb Thackeray Hospital
Balasaheb Thackeray Hospitalesakal
Updated on

Balasaheb Thackeray Apla Dawakhana : महाराष्ट्र दिनाचे निमित्त साधून महापालिकेकडून चुंचाळे येथे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण होणार आहे.

पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार या वेळी उपस्थित राहणार आहे. (Balasaheb Thackeray Hospital Inauguration of Apla Dawakhana by CM Shinde of Maharashtra nashik news)

आरोग्य सेवा दर्जेदार होण्याबरोबरच आरोग्य निर्देशांक वाढविण्याच्या उद्देशाने हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही संकल्पना राज्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्यामार्फत अमलात आणली जात आहे.

आपला दवाखाना संकल्पनेमध्ये दुपारी दोन ते रात्री दहा या वेळेत बाह्य रुग्णसेवा, मोफत औषधोपचार, मोफत तपासणी, तज्ज्ञांचा सल्ला, गर्भवती मातांची तपासणी, बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणीची सोय,

महिन्यातून निश्चित केलेल्या दिवशी नेत्र तपासणी, मानसिक आरोग्यसेवा, समुपदेशन सेवा, आवश्यकतेनुसार विशेषज्ञ मार्गदर्शन सेवा या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Balasaheb Thackeray Hospital
NMC Tax Recovery : सुटीच्या दिवशीही कर भरणा कार्यालय सुरू!

महापालिका हद्दीत पहिल्या आरोग्यवर्धिनी केंद्राचे आपला दवाखान्यात रूपांतर केले असून, चुंचाळे घरकुल शिवारातील त्याची उभारणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र दिनी लोकार्पण सोहळा होणार आहे.

कार्यक्रमास आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, सरोज अहिरे, महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी गंगाथरन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल उपस्थित राहणार आहे.

Balasaheb Thackeray Hospital
NMC News : झोपडपट्टी स्वच्छतेसाठी आयुक्त मैदानात; लेखानगर झोपडपट्टीचा घेतला आढावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.