Balasaheb Wagh : राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष म्हणून जबाबदारी वाहत असताना केवळ नामधारी म्हणून रहावे लागत होते. आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडून कोणत्याही निर्णय प्रक्रियेत विचारले जात नव्हते. निवडणुकीत मिळालेल्या यशाचे श्रेय कोकाटे यांच्याकडून कार्यकर्त्यांना दिले जात नाही. (Balasaheb Wagh statement after joining shivsena waje group suffocation while working with MLA Kokate nashik news)
अपयशाचे खापर मात्र कार्यकर्त्यांवर फोडले जाते. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना घुसमट होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी गुरुवारी (ता.२०) माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले.
सिन्नर बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना श्री. वाघ यांनी कोकाटे गटाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे सिन्नर तालुक्यात खळबळ उडाली आहे. येत्या दोन दिवसात तालुकाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा वरिष्ठांकडे पाठवणार असल्याचे श्री. वाघ यांनी सांगितले.
शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख प्रसाद नागावकर, माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवा नेते उदय सांगळे यांच्या हस्ते वाघ यांच्यासह कोकाटे समर्थक योगेश माळी यांचा सत्कार करून शिवसेनेत स्वागत करण्यात आले. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी घडलेल्या या नाट्यमय घडामोडीमुळे सिन्नरच्या राजकारणात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
वाघांच्या कार्यकर्त्यांना वाजे गटातून उमेदवारी
सिन्नर : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेत माघारीच्या अंतिम क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या पक्षांतराने मोठी खळबळ उडाली. या अनपेक्षित घटनेवर अनेकांचा विश्वास बसत नव्हता.
आमदार कोकाटेंकडे ज्या दोन कार्यकर्त्यांच्या उमेदवारीसाठी वाघ अडून बसले होते, त्यापैकी योगेश माळी व रघुनाथ आव्हाड यांना माजी आमदार राजाभाऊ वाजे उदय सांगळे यांच्या गटाकडून उमेदवारी देण्यात आली.
त्यासाठी या दोन्ही नेत्यांच्या शब्दाखातर स्पर्धक कार्यकर्त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. त्यांचे माजी आमदार वाजे यांनी आभार मानले. नारायणशेठ वाजे, भारत कोकाटे, बंडूनाना भाबड, जगन पा. भाबड, हेमंत नाईक, सोमनाथ वाघ, , संग्राम कातकाडे, विजय जाधव, रावसाहेब आढाव, रामनाथ पावसे, सोमनाथ तुपे, प्रमोद चोथवे, नामदेव शिंदे, अरुण वाघ, विठ्ठलराव राजेभोसले, ईलाहीबक्ष शेख, विकास शेंडगे आदींसह तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे गटाकडून जनसेवा पॅनलची घोषणा करण्यात आली. या पॅनलमध्ये संधी दिलेले उमेदवार पुढीलप्रमाणे-
सोसायटी गट : सर्वसाधारण- शरद थोरात (पंचाळे), सोमनाथ जाधव (कोमलवाडी), शरद गीते (मेंढी), जालिंदर थोरात (पाथरे), योगेश माळी (मनेगाव), शिवनाथ दराडे (दापूर), रघुनाथ आव्हाड (दोडी), महिला राखीव गट- सुनीता कदम (कोळगाव माळ), ताराबाई कोकाटे (खडांगळी), इतर मागास प्रवर्ग ः शिवाजी खैरनार (चास), विमुक्त जाती भटक्या जमाती - नवनाथ घुगे (पास्ते).
ग्रामपंचायत गट : सर्वसाधारण - रवींद्र पवार (सोनांबे), श्रीकृष्ण घुमरे (पांगरी), अनुसूचित जाती जमाती- गणेश घोलप (खोपडी), आर्थिक दुर्बल- प्रकाश तुपे (बेलू). व्यापारी गट- सुनील चकोर (पाटोळे), रवींद्र शेळके (नांदुरशिंगोटे). हमाल तोलारी गट ः किरण गोसावी (नांदुरशिंगोटे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.