Nashik Plastic Ban : शहरात एकल वापराच्या प्लास्टिक वस्तूचे उत्पादन, विक्री, वापरावर बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण व वने व हवामान बदल मंत्रालयाने काढलेल्या अधिसूचनेच्या आधारे महानगरपालिका प्रशासनाने हा निर्णय जाहीर केला आहे.
या निर्णयानुसार सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमाद्वारे पॉलिस्टीरीन आणि विस्तारित पॉलिस्टीरीनसह सिंगल यूज प्लॅस्टिकचे उत्पादन, आयात, साठवण, वितरण विक्री, आणि वापरावर बंदी असेल.(Ban on single use plastic items by malegaon municipal corporation nashik news)
बंदी असलेल्या उत्पादनांमध्ये प्लास्टिकच्या कांडयासह कानकोरणी, फुग्यांसाठी प्लॉस्टिकच्या कांडया, प्लॅस्टिकचे झेंडे, केंडी, कांडया, आईस्क्रीम कांडया, सजावटीसाठी प्लास्टिक व पॉलिस्टीरीन (थर्माकोल) यासह प्लेटस, कप, ग्लासेस, कटलरी, जसे काटे, चमचे चाकू, पिण्यासाठी स्ट्रॉ, ट्रे, ढवळण्या, (स्टिरर्स), मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड, सिगारेटची पाकीटाभोवती प्लास्टिक फिल्म गुंडाळणे किंवा पॅक करणे, प्लास्टिकच्या पीव्हीसी बॅनर (१०० मायक्रॉन पेक्षा कमी) आदींवर प्रतिबंध असेल.
याबरोबरच महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अधिसूचनेनुसार सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या (कॅरी बॅग्स) - हॅडल असलेल्या व नसलेल्या. कंपोस्टेबल प्लास्टिक (कचरा व नर्सरीसाठीच्या पिशव्या सोडून), सर्व प्रकारच्या नॉन ओव्हन बॅग्स (पॉलीप्रोपिलीन पासून बनविलेले), एकल वापर प्लास्टिकचे उत्पादन- डिश, बाउल, कॅन्टेनर (डबे) (हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगकरीता). शहरातील उत्पादक, साठवणूकदार, वितरणकर्ता, दुकानदार, ई. कॉमर्स कंपन्या, रस्त्यावर विक्री करणारे व्यावसायिक आस्थापना (मॉल, मुख्य बाजार विक्री केंद्र / सिनेमा केंद्र / पर्यटन ठिकाण /शाळा महाविद्यालय / कार्यालयीन इमारती / रुग्णालय व खासगी संस्था ) सामान्य नागरीकांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे महापालिकेने आदेशात म्हटले आहे.
नियम तोडल्यास दंड अन शिक्षा
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर माल जप्त करणे, पर्यावरणीय नुकसान भरपाई आकारणे, उद्योग, व्यावसायिक आस्थापना यांचे कामकाज बंद करणे आदी कारवाई केली जाईल. या गुन्ह्यात पहिला गुन्हा पाच हजार, दुसऱ्या गुन्ह्यासाठी दहा हजार तर तिसऱ्या गुन्ह्यासाठी २५ हजार रुपये व ३ महिन्याचा कारावास अशी शिक्षेची तरतूद आहे. सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.