एकल वापराच्या प्लास्टिकवर 1 जुलैपासून बंदी : जिल्हाधिकारी जलज शर्मा

एकल वापर प्लास्टिकच्या वापरावर एक जुलै २०२२ पासून शासनाने बंदी घातली आहे.
Dhule District collector
Dhule District collectoresakal
Updated on

धुळे : एकल वापर प्लास्टिकचे लवकर विघटन होत नाही. विघटन प्रक्रियेला काही वर्षांचा कालावधी लागतो. त्याचा पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. या एकल वापर प्लास्टिकच्या वापरावर एक जुलै २०२२ पासून शासनाने बंदी घातली आहे. या बंदीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी तथा एकल वापर प्लास्टिक निर्मूलन करण्यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी स्थापन जिल्हास्तरीय कृती दलाचे अध्यक्ष जलज शर्मा यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज दुपारी जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक झाली. जिल्हाधिकारी शर्मा अध्यक्षस्थानी होते. महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्योतिकुमार बागूल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रणव पाखले, जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार, शिरपूर पालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर, साक्री नगरपंचायतीचे मुख्याधिकारी देवेंद्रसिंह परदेशी आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Dhule District collector
ग्राहक सेवा केंद्रावर खातेदाराची फसवणूक; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, दैनंदिन जीवनात एकल वापर प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम पर्यावरणावर दिसून येत आहेत. एवढेच नव्हे, तर प्लास्टिकच्या अतिवापरामुळे वन्यजीव, प्राणी, जलचरांवरही परिणाम होत आहेत. पर्यावरणावर होणारे विपरीत परिणाम थांबवून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी एकल वापर प्लास्टिकवर बंदी घालण्यात येणार आहे. नागरिकांनीही एकल वापर प्लास्टिकचा वापर थांबवीत पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पुढे यावे. सजावटीसाठी वापरले जाणारे प्लास्टिक व थर्माकोल, मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड, सिगारेट पाकिटावर आवरण म्हणून वापरले जाणारे प्लास्टिक, प्लास्टिक काड्यांचा वापर असलेले कान कोरणे, प्लास्टिकच्या काड्या, प्लास्टिकचे झेंडे, कॅण्डी, आइस्क्रीम कांड्या, प्लास्टिक प्लेट्स, कप, ग्लासेस आदी साहित्याचाही समावेश आहे.

Dhule District collector
धुळ्यात भर दिवसा तरुणाचा खून

एकल वापर प्लास्टिकवर बंदी येणार असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांनी नागरिकांमध्ये जनजागृती करून पर्यायी कापडी पिशव्या, कागदापासून बनविलेल्या पिशव्या वापरण्यास नागरिकांना प्रवृत्त करावे, असेही जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले. त्यांनी जैविक कचऱ्याची विल्हेवाट, घनकचऱ्याचे व्यवस्थापन आदींचा आढावा घेतला. प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी श्री. पाखले यांनी एकल प्लास्टिक वापर व प्रतिबंधाविषयी सविस्तर माहिती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()