बाणगाव बुद्रूक (जि. नाशिक) : कौळाणे फाटा, नांदगाव- येवला रस्ताचे हायब्रीड अॅन्युइटीमधून मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी १२० कोटी रुपये खर्चाची मंजुरी असून चार वर्षांपासून नियोजित रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असून.
सदर काम सुरू असतानाच काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्याला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. रस्ता बांधकामात वापरण्यात येणाऱ्या साहित्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. (Bangaon road work of poor quality Cracks in concreted road Nashik News)
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत नांदगाव ते येवला रस्त्याचे काँक्रिटीकरण-डांबरीकरणाचे काम केले जात आहे. मात्र हे काम अतिशय संथ गतीने केले जात आहे. बाणगाव बुद्रूक येथे रस्त्याचे काँक्रिटीकरणचे काम कधी सुरू ते कधी बंद असते.
करताना संबंधित ठेकेदाराने दक्षता घेतलेली नाही. एका बाजूचे काँक्रिटीकरणचे काम पूर्ण झाल्यावर झालेल्या या कामावर गोणपाट टाकून दररोज पाणी मारून क्यूरीन करणे गरजेचे होते व यावर वाहतूक बंद करून दुसऱ्या बाजूने वाहतूक करणे क्रमप्राप्त असताना हा रस्ता लगेच वाहतुकीसाठी खुला केला आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहे.
बाणगाव गावात येवला रस्त्याला जोडण्याऱ्या रस्त्याचा काही भाग मजबूत करणे अपेक्षित असताना तिथे ही कामे सोडून देण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे.
हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....
तर पुलाच्या ठिकाणी रस्ता अरुंद झाला आहे. या ठिकाणी सूचना फलक लावलेला नाही. ज्या ठिकाणी डांबराचा लेअर झाला आहे तेथे रस्ता उंच झाला आहे. पण, रस्ता शेजारी सिमेंट नाली नसल्याने पावसाचे पाणी कसे जाणार? हा प्रश्न आहे.
विशेष म्हणजे या रस्त्याची ज्यांच्याकडे देखभाल दुरुस्तीसह नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या येवल्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरवस्थेकडे कानाडोळा केला आहे.
"बाणगाव बुद्रूक येथे रस्ता काँक्रिटीकरण काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. काँक्रिटीकरण झालेल्या कामावर पाणी मारले जात नाही. काँक्रिटीकरण झालेला रस्ता लगेचच वाहतुकीसाठी खुला केला आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असून हा रस्ता लगेच उखडून जाईल. या कामात गैरप्रकार होत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे व या कामाची चौकशी करावी." - बापूसाहेब कवडे, ज्येष्ठ नेते नांदगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.