बांगलादेश सरकारने बुधवार (ता. २)पासून कांदा आयातीचा परवाना देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी निर्यातदारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
नाशिक : पश्चिम बंगालप्रमाणेच बांगलादेशमधील कांद्याची आवक संपुष्टात आल्याने आता नवीन कांद्याची आवक जानेवारी-फेब्रुवारीपासून सुरू होईपर्यंत भारतीय कांद्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. अशातच, बांगलादेश सरकारने बुधवार (ता. २)पासून कांदा आयातीचा (Onion Import) परवाना देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी निर्यातदारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
बांगलादेशमध्ये दिवसाला सर्वसाधारणपणे ४० ते ५० ट्रकभर म्हणजेच, एक हजार टनाच्या आसपास कांद्याची निर्यात होते. नाशिकच्या उन्हाळ कांद्याला आणखी भाव मिळण्याच्या दृष्टीने बांगलादेश सरकारचा आयात-निर्यातीचा फायदा होईल, असा विश्वास कांदा निर्यातदार विकास सिंह यांनी व्यक्त केला. दरम्यान, सध्याच्या निर्बंधाच्या काळात बांगलादेशमध्ये कांदा भरलेले ट्रक येण्यास प्रतिबंध होता. त्यामुळे बांगलादेशच्या सीमेवर कांदा भरलेल्या शंभर ते १५० ट्रक उभ्या असल्याची माहिती व्यापाऱ्यांपर्यंत पोचली आहे. दरम्यान, बांगलादेश सरकारकडून आयातीचा परवाना दिल्यानंतर किती कांद्याची आयात करायची आणि ती कधी करायची, याची माहिती दिली जाईल. बांगलादेशमधील कांद्याची निर्यात खुली होणार असल्याने येत्या जानेवारीपर्यंत कांद्यासाठी बाजारपेठ उपलब्ध असेल. बांगलादेशमध्ये जानेवारीमध्ये नवीन कांदा विक्रीसाठी येण्यास सुरवात होत असली, तरीही प्रत्यक्षात फेब्रुवारी ते मेपर्यंत बांगलादेशमध्ये स्थानिक कांद्याची विक्री होते. भारतीय कांद्यावर बांगलादेशला अवलंबून राहावे लागते. अशा स्थितीत भारताच्या कांदा निर्यातीच्या धरसोडीच्या धोरणाच्या अनुषंगाने बांगलादेशच्या सरकारमधील मंत्र्यांनी काहीसा नाराजीचा सूर आळवला होता.
(Bangladesh government will issue onion import license from today)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.