बँक ऑफ महाराष्ट्र कर्जवाढीमध्ये सार्वजनिक बँक क्षेत्रात अव्वल!

bank of maharashtra
bank of maharashtraesakal
Updated on

नाशिक : सार्वजनिक क्षेत्रातील (Public Sector) बँकीग क्षेत्रात २०२१-२२ मध्ये बँक ऑफ महाराष्ट्राने (Bank of Maharashtra) कर्ज (loan) आणि ठेवींच्‍या (Deposits) वाढीच्‍या टक्‍केवारीत अव्वल कामगिरी केली आहे. मार्च २०२२ च्या अखेरीस बँक ऑफ महाराष्ट्राने सकल कर्ज व्यवहारात २६ टक्के वाढ नोंदवून एक लाख ३५ हजार २४० कोटी रुपयांची नोंद केली आहे. (Bank of Maharashtra leads public sector in lending growth Nashik News)

महाराष्ट्र बँकेपाठोपाठ स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) यांनी अनुक्रमे १०.२७ टक्‍के आणि ९.६६ टक्के वाढ नोंदविली आहे. आकडेवारीचा विचार केल्‍यास भारतीय स्टेट बँकेचा एकूण कर्जे व्यवहार २४ लाख ६ हजार ७६१ कोटी रुपये म्‍हणजे सुमारे अठरा पटींनी जास्‍त आहे. बँक ऑफ महाराष्ट्राच्या तुलनेत युनियन बँक ऑफ इंडियाचे चौथ्या तिमाहीच्या शेवटी सहा लाख ९९ हजार २६९ कोटी इतकी कर्जे होती. ठेवींबाबत बँक ऑफ महाराष्ट्राने १६.२६ टक्के वाढ नोंदवली आहे.

मार्च २०२२ अखेरीस दोन लाख २ हजार २९४ कोटी रुपये जमा केले. युनियन बँक ऑफ इंडिया ठेवींमध्ये ११.९९ टक्‍के वाढीसह (दहा लाख ३२ हजार १०२ कोटी) दुसऱ्या स्थानावर आहे. प्रकाशित आकडेवारीनुसार इंडियन बँकेने दहा टक्क्यांनी वाढ करून पाच लाख ८४ हजार ६६१ कोटींचा व्‍यवसाय नोंदविला आहे.

bank of maharashtra
Nashik : रावसाहेब मोगलांचा बैलगाडा ठरला देशात अव्वल!

महाराष्ट्र बँकेचा एकूण व्यवसाय वाढ सर्वाधिक २० टक्के म्हणजे तीन लाख ३७ हजार ५३४ कोटी रुपये होती. त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडियाची ११.०४ टक्के वाढीसह १७ लाख ३१ हजार ३७१ कोटी रुपये होती.

bank of maharashtra
Nashik : खतांची लिंकिंग कृषीच्या नजरेआड!

महाराष्ट्र बँकेचे सकल अनार्जक कर्जे (एनपीए) मार्च २०२१ मध्ये ७.२३ टक्क्यांवरून जवळपास ३.९४ टक्क्यांवर आले. निव्वळ अनार्जक कर्जे मार्च २०२१ मधील २.४८ टक्क्यांवरून ०.९७ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. मार्चपर्यंतच्या संपूर्ण वर्षासाठी बँकेच्या निव्वळ नफ्यात वित्तीय वर्ष २०२१ मधील ५५० कोटी रुपयांच्या तुलनेत दुप्पट वाढ होऊन निव्वळ नफा एक हजार १५२ कोटी रुपयांवर पोहोचला. बँक ऑफ महाराष्ट्राने चालू आर्थिक वर्षात निव्वळ नफ्यात २५-३० टक्क्यांच्या वाढ करण्यावर लक्ष ठेवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.