Nashik News : रस्त्यावर वटवृक्ष कोसळला; थोडक्यात चिमुकले बचावले

A fallen tree on the road
A fallen tree on the roadesakal
Updated on

जुने नाशिक : नासर्डी पूल ते इस्कॉन मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वटवृक्ष अचानक कोसळले. कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळे रस्त्यावर खेळणारे चिमुकले थोडक्यात बचावले. गुरुवारी (ता. १) दुपारी ही घटना घडली. (banyan tree fell on road children saved Nashik Latest Marathi News)

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

A fallen tree on the road
Nashik News: ‘Civil’मधील कंत्राटी कर्मचारी विनावेतन; सफाई कामगारांसमोर आर्थिक संकट

वृक्ष कोसळण्याच्या काही मिनीट अगोदर दोन चारचाकी वाहने वृक्षाच्या काही अंतरावर पुढे गेले आणि वृक्ष कोसळला. दोन्ही चारचाकी चालकांचे दैवत बलवत्तर असल्याने सुदैवाने ते थोडक्यात बचावले. इतकेच नाही तर त्याच ठिकाणी काही चिमुकले खेळत होते. त्यांच्या कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळे वेळीच चिमुकल्यांना तेथून बाजूला केल्याने दुर्घटना टळली.

सर्व्हिस रोडला लागून दहा ते पंधरा कुटुंबीय झोपड्यांमध्ये वास्तव्यास आहे. त्यांच्या शेजारीच पुरातन जुने वटवृक्ष होते. गुरुवारी दुपारी वृक्ष कोसळण्यापूर्वी त्याचा आवाज रहिवाशांना आला. त्यांनी घरातून बाहेर पडत रस्त्यावर खेळणाऱ्या चिमुकल्यांना सुरक्षित स्थळी आणले. चिमुकले तेथून बाजूला होताच वृक्ष कोसळले. मोठा वृक्ष असल्याने संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता.

शिवाय वीज वितरण विभागाच्या तारांसह विविध प्रकारच्या तारांवर वृक्ष कोसळल्याने तारी, वायर तुटून पडल्या. झोपड्यांतील रहिवाशांना वृक्षाचा आवाज आला नसता, तर कदाचित मोठी दुर्घटना घडली असती. रस्त्यावर वृक्ष कोसळला तोच वृक्ष रस्त्यावर न कोसळता त्यास लागून असलेल्या झोपड्यांवर कोसळला असता तर काय झाले असते, असा विचारही झोपड्यांतील रहिवाशांमध्ये भीती निर्माण करत होता. अग्निशामक विभागास माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत मार्ग वाहतुकीसाठी मोकळा करून दिला.

A fallen tree on the road
Drug Racket : महाविद्यालयांपर्यंत पोचले नशेचे ‘रॅकेट’; व्यसनाधीन मुलांसमोर पालक हतबल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()