Vatpornima News : झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत महिलांकडून वटपौर्णिमा उत्साहात साजरी

The women of Vrikshamitra Foundation of Sanjeevani Nagar planted trees on the day of Vatpurnima with the message 'Plant trees, live trees'
The women of Vrikshamitra Foundation of Sanjeevani Nagar planted trees on the day of Vatpurnima with the message 'Plant trees, live trees'esakal
Updated on

Nashik News : वटसावित्री हा सण महिलांचा असल्याने सर्वीकडे वडाची पूजा वटपौर्णिमेच्या दिवशी करण्यात येते. अनेक महिला नऊवारी साडी नेसून तसेच पूजाचे साहित्य घेऊन वडाची पूजा करतात.

या दिवशी पत्नी आपल्या पतीसाठी आयुष्यभराची साथ वडाच्या झाडाला फेऱ्या मारून तसेच दिवसभर उपवास धरून करतात. (banyan tree planted 1 year ago Today after 1 year same worshipped with devotion Nashik News)

वडाचे झाड हे अनेक औषधी उपयोगी असून या झाडाचे संगोपन झाले पाहिजे. या हेतूने सिन्नर शहरातील संजीवनी नगर येथील वृक्षमित्र फाउंडेशनने व वृक्षमित्र देवराई येथे एक वर्षांपूर्वी वड वृक्ष लावलेला होता.

सुमारे वर्षभर या झाडाची संपूर्ण देखभाल करण्यात आल्यानंतर या छोट्याशा रोपट्याचे रूपांतर आज मोठ्या रोपट्यात होताना अतिशय आनंद महिला वर्गाला झाला. याच वटवृक्षाची पूजा संजीवनी नगर येथील महिलांनी केली.

यावेळी वृक्ष लागवडीचे महत्त्व महिलांनी वृक्षरोपणाद्वारे पटवून दिले झाडे लावा झाडे जगवा हा संदेश सर्व वृक्षमित्र फाउंडेशनच्या महिलांनी दिला. यावेळी वृक्षमित्र फाउंडेशनचे सर्व महिला सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

The women of Vrikshamitra Foundation of Sanjeevani Nagar planted trees on the day of Vatpurnima with the message 'Plant trees, live trees'
Crime News Nagpur : कावीळच्या औषधीसाठी आली अन् बाळ घेऊन गेली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.