Nashik Bar Council : ‘त्या’ न्यायाधीशांची बदली करा, अन्यथा बहिष्कार; नाशिक बार कौन्सिलचा इशारा

Bar Council Warning to transfer Judges nashik new
Bar Council Warning to transfer Judges nashik newesakal
Updated on

Nashik Bar Council : नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात एका न्यायाधीशांविरोधात नाशिक बार कौन्सिलचे वकील एकवटले आहेत.

कामकाज करीत असताना अरेरावी करणे, अपमानास्पद वक्तव्य आणि उद्धटपणे वर्तणूक करीत असल्याने त्या न्यायाधीशांची बदली करण्यात यावी, अन्यथा त्यांच्यासमोरील कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येईल, अशी एकमुखी मागणी नाशिक बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्यासंदर्भातील निवेदन प्रधान जिल्हा न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांना देण्यात आले. ( Bar Council Warning to transfer Judges nashik news)

नाशिक जिल्हा बार कौन्सिलची बैठक अध्यक्ष ॲड. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीला बार कौन्सिलचे सदस्य ॲड. जयंत जायभावे, बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड. अविनाश भिडे यांच्यासह ज्येष्ठ विधिज्ञ उपस्थित होते. या वेळी वकील सदस्यांनी जिल्हा न्यायालयातील एका न्यायधीशांच्या वागणुकीविषयी तक्रारी केल्या.

कौन्सिलकडे यापूर्वीही तक्रारी करण्यात आल्याने सदरील बैठक घेण्यात आली. सदरील न्यायाधीशांसमोर कामकाज करताना वकील सदस्यांना अपमानास्पद वागणूक मिळते, अरेरावी केली जाते. त्यामुळे अनेक वकील सदस्य त्या न्यायाधीशांच्या कोर्टात कामकाज करण्यात इच्छुक नाहीत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Bar Council Warning to transfer Judges nashik new
Chhagan Bhujbal News : गरीब कुटुंबांपर्यंत पोहोचवा रेशनचे धान्य; भुजबळांचे अधिकाऱ्यांना निर्देश

यासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञांनी सदरील न्यायाधीशांची जिल्हा विधी प्राधिकरणमध्ये बदली करावी, अन्यथा त्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात बार कौन्सिलतर्फे तक्रार करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन नाशिक बार कौन्सिलतर्फे प्रधान जिल्हा न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांना देण्यात आले.

या वेळी ॲड. अनंत कुलकर्णी, ॲड. झुंजार आव्हाड, ॲड. संतोष गटकल, ॲड. पी. आर. गिते, ॲड. जी. डी. नवले, ॲड. केदार दंदणे, ॲड. संगीता चव्हाण यांनी तक्रारींचा पाढा वाचला. बैठकीस उपाध्यक्ष शेटे, सचिव ॲड. हेमंत गायकवाड, ॲड. संजय गिते, ॲड. लीलाधर जाधव, ॲड. लाहोटी, ॲड. अरुण माळोदे, ॲड. प्रतीक शिंदे आदी वकील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"वकील सदस्यांना कामकाज करीत असताना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या न्यायाधीशांची बदली करण्याची मागणी बार कौन्सिलतर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन बार कौन्सिलतर्फे प्रधान जिल्हा न्यायधीशांना देण्यात आले. त्या न्यायाधीशांसमोर वकील सदस्य कामकाज करण्यास इच्छुक नाहीत." - ॲड. नितीन ठाकरे, अध्यक्ष, नाशिक बार कौन्सिल

Bar Council Warning to transfer Judges nashik new
Maharashtra News : देशात कपाशीच्या साडेआठ लाख गाठींनी कमी उत्पादनाचा अंदाज; महाराष्ट्र कर्नाटकमध्ये उत्पादनात घट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.