नामपूर (जि. नाशिक) : राज्यातील विविध सहकारी संस्थांच्या प्रलंबित राहिलेल्या निवडणुका मार्चपासून सुरू होणार असून, निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सहकार निवडणूक प्राधिकरणाकडून जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मार्चच्या रणरणत्या उन्हात सहकाराचे राजकारण तापणार आहे. (Battle of Cooperative Societies election since March Order to initiate election process nashik news)
गेली दोन वर्षे विविध कारणांनी या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने विद्यमान संचालक मंडळांना दोन ते अडीच वर्षांचा बोनस कार्यकाळ मिळाला.
आता १ एप्रिल २०२१ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत निवडणुकीस पात्र अ, ब, क व ड वर्गातील राज्यातील एकूण २० हजार ६३८ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया १ मार्चपासून सुरू होणार आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने १५ फेब्रुवारीच्या आदेशानुसार निवडणुकीस पात्र सर्व प्रकारच्या सहकारी संस्था (कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था वगळता) यांच्या निवडणूक प्रक्रिया १ मार्चपासून सुरू करण्याबाबत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना आदेशित केले आहे.
या संस्थांच्या निवडणुकांसाठी १ फेब्रुवारी २०२३ या अर्हता दिनांकावर प्रारूप मतदारयाद्या तयार करण्यात येणार आहेत.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
निवडणूक प्राधिकरणाने निवडणुकीस पात्र अ, ब, क व ड वर्गातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया संचालक मंडळाची मुदत संपण्यापूर्वी अनुक्रमे १५०, १२०, ६० व ६० दिवस अगोदर सुरू करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.
या संस्थांच्या निवडणुकांसाठी संचालक मंडळाची मुदत संपल्याच्या दिनांकावर प्रारूप मतदारयाद्या तयार करण्यात येणार आहेत.
"ज्या संस्था निवडणुकीसाठी प्रारूप मतदारयादी सादर करणार नाहीत किंवा पुरेसा निवडणूक निधी उपलब्ध करणार नाहीत, अशांवर सहकारी संस्था अधिनियमान्वये कारवाई करण्याचे आदेश जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ‘अ’ वर्ग संस्थांमध्ये २८ सहकारी साखर कारखाने, तीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, २६ सहकारी सूतगिरण्यांचा समावेश आहे."- डॉ. पी. एल. खंडागळे, सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण
निवडणूकपात्र सहकारी संस्था
- अ : ६३,
- ब : एक हजार १४,
- क : दहा हजार १६३
- ड : नऊ हजार ३९८
- एकूण : २० हजार ६३८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.