Nashik News : बाजार समिती उत्तरेकडील प्रवेशद्वारावरील दुकानदारांची अतिक्रमण वाढले असल्याने शेतकऱ्यांना ये-जा करताना वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. यामुळे रहदारीसाठी सदर प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते.
यावर स्थानिक दुकानांनी वाढलेले अतिक्रमण हटविले असून वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही असे बाजार समितीस आश्वस्त केले. यामुळे सभापती देवीदास पिंगळे व उपसभापती व संचालक मंडळ यांनी अखेर मार्ग खुला केला आहे. (Bazaar Samiti closed entrance finally opened Easy way for farmers Nashik News)
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात येण्यासाठी उत्तरेकडील प्रवेशद्वाराहून शेतकरी भाजीपाला घेऊन येत असतात. याच प्रवेशद्वारावर स्थानिक दुकानासमोर रस्त्यात उभ्या केलेले असतात. या वाहनांमुळे वाहतूक कोंडीत काही शेतकऱ्यांची वाहने अडकली होती.
सदर बाब ही संचालक मंडळांनी निदर्शनास आली, त्यामुळेच या प्रवेशद्वाराला टाळे ठोकले होते. आणि या प्रवेशद्वाराजवळील अनेक दुकानदारांनी दुकानाबाहेर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याने रस्ता अरुंद झाला आहे.
तसेच, या ठिकाणी येणारे ग्राहक रस्त्यावर गाडी लावत असल्याने बाजार समितीत येताना अडचण होते. यामुळे रस्ता बंद केल्याचे दुकानदारांना बाजार समितीतून सांगण्यात आले होते.
तर काही दुकानदार अतिक्रमण काढत नसल्याने व इंद्रकुंडाच्या बाजूने या दुकानात ग्राहक येत असल्याने सर्व दुकानदारांनी मिळून पुढील बाजूने दोऱ्या बांधून रस्ता बंद केला होता.
यानंतर अतिक्रमण बाकी असलेल्या दुकानदाराने तेथील अतिक्रमण काढून घेतले असून रस्ता मोकळा करण्यात आला आहे. ज्या अतिक्रमणाचा त्रास बाजार समितीत येण्या-जाण्यासाठी होत आहे ते सर्व अतिक्रमण काढून घेण्यात आले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
तसेच यापुढे खबरदारी म्हणून मार्केट यार्डमध्ये जाण्या-येण्याचा रस्ता व्यवस्थितपणे शेतकऱ्याला आत मोकळा व व्यवस्थित राहील याची काळजी घेऊ व आलेल्या मालाच्या गाड्या आम्ही गर्दी नसताना खाली करू व आलेल्या ग्राहकाला गाडी व्यवस्थित पार्क करून जाण्या येण्याचा मार्ग कसा सुरळीत करून देण्यात येईल असे बाजार समितीस आश्र्वस्त केले होते.
भाजपचीही उडी
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यांच्या दिंडोरी रोडवरील मार्केटचे दक्षिणेकडील इंद्रकुडाच्या बाजूचे गेट अचानक बंद केले आहे. त्यामुळे त्या परिसरातील व्यापारी, ग्राहक, छोटे दुकानदार, व्यावसायिक, शेतकरी यांचे अतोनात हाल होत आहेत.
कोणतीही पूर्व सूचना न देता केवळ काही काळ वर्दळीमुळे सदर गेट बंद केले होते. तरी देखील सहकार व पणन विभागाने सुद्धा गांभीर्याने नोंद घ्यावी व संबंधितांना सूचना करावी व गेट उघडण्यास सांगावे अन्यथा नाइलाजास्तव गेट तोडो आंदोलन करून हे दोन्ही गेट मोकळे करावे असा इशारा भाजप पदाधिकारी, मंडलाध्यक्ष आदींनी पत्रकान्वये दिला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.