Nashik Sports News : ‘भारत- अ’ विरुद्ध अंतिम सामन्‍यात ईश्‍वरी सावकार च्‍या सर्वाधिक धावा

Cricket
Cricketesakal
Updated on

नाशिक : श्रीलंका, वेस्ट इंडिज, भारत-अ आणि भारत- ब या संघांतील चौरंगी मालिकेत नाशिकच्‍या ईश्‍वरी सावकारने भारत- ब संघात स्‍थान मिळविले होते. स्‍पर्धेदरम्‍यान उत्‍कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या ईश्‍वरी सावकारने भारत-अ संघाविरुद्धच्‍या अंतिम सामन्‍यात आपल्‍या संघाकडून सर्वाधिक ३६ धावांचे योगदान दिले.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) तर्फे आयोजित १९ वर्षांखालील महिला टी- ट्वेंटी चौरंगी मालिका वायझॅग इथे पार पडली. या स्‍पर्धेतील अंतिम सामन्‍यात प्रथम फलंदाजी करत भारत- ब संघाने २० षटकांत ७ बाद १२९ धावा केल्या. (BCCI organized india women T Twenty cricket competition winner nashik women cricketer Ishwari Savkar Nashik Sports News)

Cricket
Nashik : महाबळेश्वर पेक्षाही नाशिक थंड; पारा 10.4 अंशावर - दिवसभर हवेत होता गारवा
Ishwari Savkar
Ishwari Savkaresakal

यामध्ये नाशिकच्‍या ईश्वरी सावकारने ३९ चेंडूत ६ चौकारांसह ३६ धावांचे सर्वाधिक योगदान दिले व १०.५ षटकांत ७७ धावांची सलामी दिली. विजयासाठी १३० धावा श्वेता शेरावतच्या ४३ धावांच्या जोरावर भारत-अ संघाने १८.३ षटकांत पूर्ण करताना हा सामना सात गडी राखून जिंकला.

स्‍पर्धेदरम्‍यान ईश्‍वरीने भारत-ब संघातर्फे सलामीला येत चारही सामन्यात सातत्यपूर्ण फलंदाजीचे प्रदर्शन घडवले. श्रीलंकेविरुद्ध ४८ चेंडूत ३० धावा, वेस्ट इंडिजविरुद्ध २६ चेंडूत ३२ धावा, भारत अ संघाविरुद्ध ३२ चेंडूत ३६ आणि अंतिम सामन्यात ३९ चेंडूत ३६ धावा अशी प्रभावी कामगिरी केली आहे.

Cricket
Dhol Bajao Campaign : पश्चिम विभागाकडून महिनाभरात 3 कोटींची थकबाकी वसूल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.