Nashik Beer Production : नाशिकला बिअरनिर्मितीचा श्रीगणेशा! उद्योग, पर्यटनाला मिळणार ऊर्जितावस्था

Abhishek Patil and Jay Patil filling beer cans
Abhishek Patil and Jay Patil filling beer cansesakal
Updated on

नाशिक रोड : नाशिक हे कांदा, द्राक्ष, चिवडा आणि वाइनचे शहर म्हणून ओळखले जात असतानाच आता येणाऱ्या काळात बिअरचे शहर म्हणूनही ओळखले जाण्याचे संकेत मिळत आहेत.

वाइनबरोबरच आता नाशिकमध्ये बिअरनिर्मितीचा श्रीगणेशा झाला आहे. विल्होळी परिसरात बिअरनिर्मितीचा प्रकल्प उभा राहिला असून, संशोधन आणि विकास या तत्त्वावर सध्या बिअरची निर्मिती आणि वितरण होत आहे. (beer production started in Nashik Industry tourism will get increased nashik news)

नाशिकमध्ये सध्या विल्होळी येथे तोपची बिअरची निर्मिती सुरू आहे. जय पाटील आणि अभिषेक पाटील या दोन मित्रांनी नाशिकच्या हवामानाचा अभ्यास करून हा कारखाना टाकला आहे.

सध्या ग्राहकांसाठी गहू आणि जवापासून बिअर तयार केली जात आहे. बेल्जियम वीट, क्रीम अले, एम्बर एल या प्रकारची बिअरनिर्मिती सध्या होत आहे.

पॅकेजिंगसाठी शासनाने अजून परवानगी दिलेली नसून पार्सल अथवा कारखान्यात जाऊन या बिअरची चव नाशिककर चाखू शकतात. पाच व आठ टक्के अल्कोहोल या बिअरमध्ये समाविष्ट करण्यात आले असून, कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह यात टाकण्यात आलेले नाही.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Abhishek Patil and Jay Patil filling beer cans
Nashik News: स्मार्ट रस्त्यावर नाशिककरांची ‘हर्डल रेस’; दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी 15. 26 मिनिटांचा वेळ!

"संशोधन आणि विकास तत्त्वावर आम्ही बिअरनिर्मिती करीत आहोत. यासाठी काळा व लाल भात वापरणार आहोत. बाजरी, नागलीपासूनही बिअरची निर्मिती करणार आहोत. द्राक्षापासून बिअरनिर्मिती करण्याचा आमचा विचार असून, बिअर आणि वाइनचा मधला प्रकार निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे." - जय पाटील, बिअर निर्माता

"जव व गव्हापासून बिअर बनवल्यानंतर उरलेला कच्चामाल आम्ही गोसेवा करणाऱ्या संस्थेला देत असतो. सध्या पुण्याहून मशिनरी मागवलेली असून, नाशिकमध्ये आम्ही प्रथमच हे आव्हान स्वीकारले आहे. नाशिकचे नैसर्गिक वातावरण बिअरनिर्मितीला पोषक आहे."

- अभिषेक पाटील

Abhishek Patil and Jay Patil filling beer cans
Ajit Pawar : ''सरकारने अनुदान देताना थट्टा करु नये'', अजित पवारांचे सरकारला खडे बोल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.