अंबासन, (जि.नाशिक) : भंडाराची उधळण करीत 'येळकोट...येळकोट, जय मल्हार'च्या जयघोषात येथील ग्रामदैवत खंडेराव महाराज यात्रोत्सोवाला सुरूवात झाली असून मंदिर परिसरात विद्युत रोषणाईने सजविण्यात आले आहे.
बाजारात यात्रोत्सोवानिमित्त विविध दुकाने थाटली आहेत तर बच्चे कंपनीसह चाकरमानी गावाकडे कुच करीत डोंगरावरील खंडेराव महाराज मंदिरात दर्शन घेत आहेत. (Beginning of Khanderao Maharaj Yatrotsav at Ambasan nashik news)
यात्रोत्सोवात तसेच मंदिर परिसरात गर्दी होऊ नये म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने पोलीसांचा चोख बंदोबस्त नियोजित करण्यात आला आहे.
यात्रोत्सोवानिमित्त ग्रामपंचायत प्रशासनाने यावर्षी थेट डोंगरावरील पाण्याच्या टाकेपर्यंत वाहन तळाची सोय केल्याने खंडेराव महाराज मंदिरात जाण्यासाठी सोयीचे होणार आहे. सोमवार (ता.२५) पासून सुरू होत असलेल्या यात्रोत्सोवानिमित्त सकाळी सात वाजेता वाजतगाजत बैलगाडीतून मांडव मिरवणूक काढण्यात येणार आहे.
त्यानंतर खंडेराव महाराज भक्तगण मानाच्या काठीची मिरवणूक काढतात. गावातील नागरिकांना दोन दिवसांपासून ग्रामपंचायत प्रशासन ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून सुचना देण्यात येत आहेत. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर हाॅटेल, खेळणी, जंप्पींग, झुला, संसारोपयोगी साहित्य, हारबांगडी आदी दुकाने थाटली आहेत. तर गोंदण सौकिननांचे दुकानातही गर्दीचा माहोल दिसून येत आहे.
मंगळवार (ता.२६) बैलगाडीतून तगतराव मिरवणूक व सावता चौकात हजेरी होणार असून रात्री भिका भिमा सांगवीकर यांचा बहुरंगी लोकनाट्य तमाशा सादरीकरण करण्यात येणार आहे. बुधवार (ता.२७) सकाळी नऊच्या सुमारास होळी चौकात हजेरी त्यानंतर दुपारी मोसम नदीकाठावर कुस्त्यांची दंगल भरविण्यात येणार असून पहिल्या कुस्तीसाठी अकरा हजार तर दुस-या कुस्तीसाठी पाच हजारांचे बक्षीस आयोजित करण्यात आले आहेत.
तसेच मोठ्या भांड्याचे बक्षीस ग्रामपंचायत प्रशासनाकडून ठेवण्यात आले आहे. हे बक्षीस आमदार दिलीप बोरसे व जिल्हा परिषद सदस्य यतिद्र पगार यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार असून परिसरातील भाविक, मल्लांनी यात्रोत्सोवात शोभा वाढवावी असे यात्रा कमिटी तसेच सरपंच राजसबाई गरूड, उपसरपंच शैलेंद्र कोर, सदस्य शशीकांत कोर, भीमाबाई भामरे, मंगलबाई कोर, भाऊसाहेब भामरे, विजय गरूड, शरद कोर, पुजा बोरसे, रंजनाबाई आहिरे, स्वाती आहिरे आदिंन आवाहन केले आहे.
यात्रोत्सोवातील वैशिष्ट्य
१) चटकदार गुळाची जिलेबी, गुळीशेव, बुंदीचे लाडू,
२) मुलांसाठी खेळणी,
३) थंडीतील नवनवीन उबदार कपड्यांची दुकाने,
४) महिलावर्गसाठी विविध संसारोपयोगी साहित्य,
५) मुलांसाठी पाळणे, मिकी माऊस, जंप्पींग जप्पांग आदी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.