Sakal Exclusive : इगतपुरी तालुक्यात रूग्णसेवेचा बोजवारा; आरोग्य केंद्र अन्‌ उपकेंद्राला चक्क कुलुप

Defects detected at Primary Health Center and Kavadara sub-centre under Dhamangaon Health Centre
Defects detected at Primary Health Center and Kavadara sub-centre under Dhamangaon Health Centre esakal
Updated on

ज्ञानेश्‍वर गुळवे : सकाळ वृत्तसेवा

Sakal Exclusive : ग्रामीण भागातील रुग्णांना चोवीस तास आरोग्यसेवा देण्याच्या उद्देशाने स्थापित करण्यात आलेले जिल्हा परिषदेचे बेलगाव कुऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कवडदरा उपकेंद्र चक्क कुलूपबंद आढळून आले आहे. (Belgaon Kurhe Health Center and Kavadara sub centre are closed nashik news)

शनिवार आणि रविवार अशा दोन्हीही दिवशी रुग्णसेवा बंद करुन आरोग्य केंद्राला टाळे आढळून आल्याने अनेक रुग्णांना उपचाराविना परतावे लागले. त्यामुळे इगतपुरीसारख्या आदिवासीबहुल तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे दिसून आले आहे.

या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. रुग्ण सेवा करायचे आणि मुख्यालयी राहायचे सोडून रविवारची सुटी मिळताच वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी सुट्टीवर गेले की काय, अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे.

संबंधित दोन्ही ठिकाणच्या दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे. विशेष म्हणजे, घोटी येथील आमसभा नुकतीच कामचुकार अधिकारी, कर्मचारी यांच्यामुळे वादळी ठरली. या आमसभेत आमदार हिरामण खोसकर यांनी संबंधीतांना कारवाईला सामोरे जा, असे ठणकावले होते. असे असताना रविवारी, म्हणजे तिसऱ्याच दिवशी बेलगांव कुऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्र व कवडदरा उपकेंद्राला चक्क कुलुप असल्याचे पाहून अनेक रूग्णांना उपचाराविना माघारी जावे लागले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Defects detected at Primary Health Center and Kavadara sub-centre under Dhamangaon Health Centre
Nashik Rain Update : व्यावसायिकांना पावसाची प्रतीक्षा; पावसाळी वस्तूंची बाजारपेठ मंदावली

गेल्या गुरुवारी (ता. १५) वैद्यकीय अधिकारी डॉ. विश्‍वनाथ खतेले यांनी बेलगांव कुऱ्हे येथील पदभार स्वीकारल्यानंतर लगेच ही घटना घडली आहे. याबाबत सहाय्यक डॉ. देवयानी गडाख यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तर, श्री. खतेले यानी आपण आपल्या गावी असल्याचे सांगितले. जिल्हा आरोग्य यंत्रणा या घटनेची गांभीर्याने दखल घेणार की नाही? आमदार खोसकर काय कारवाई करणार? असे प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

"पत्नी आजारी असल्याने शनिवारी दुपारी बेलगावच्या दवाखान्यात आलो होतो. दवाखान्याला कुलुप लावलेले असल्यामुळे माघारी गेलो. रविवारी पुन्हा आलो, तेव्हाही दवाखान्याला कुलुप होते. थोडा वेळ थांबलो; पण कुणीही आले नाही. पुन्हा परत जाण्याशिवाय पर्याय नाही." -सीताराम तारडे, नागरिक

"प्राथमिक आरोग्य केंद्रात शासनाने चोवीस तास सेवा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र, कामचुकार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे वैद्यकीय सेवा कुचकामी ठरत आहे. बेलगाव कुऱ्हे आरोग्य केंद्राला टाळे लावून ग्रामीण जनतेच्या आरोग्य सेवेत हलगर्जी करणाऱ्यांची चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल." -हिरामण खोसकर, आमदार

"कामानिमित्त गावी आलो आहे. डॉ. गडाख आणि परिचारिका रुग्णालयात उपस्थित होत्या." -डॉ. विश्‍वनाथ खतेले, वैद्यकीय अधिकारी, बेलगाव कुऱ्हे

Defects detected at Primary Health Center and Kavadara sub-centre under Dhamangaon Health Centre
Mahakavi Kalidas Din 2023 : नाशिकच्या वैभवात हरपले ‘कालिदासां’चे शिल्प; शहरीकरणासोबतच हरवली शिल्प

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.