नाशिक : पंतप्रधान आवास योजनेपासून लाभार्थी वंचित

Prime Ministers Housing Scheme
Prime Ministers Housing Schemeesakal
Updated on

किकवारी बुद्रुक (जि. नाशिक) : पंतप्रधान आवास योजनच्या प्रतिक्षा यादीत नाव समावेश असलेल्या अनेक कुटुंबाची शेवटच्या पाहणी अहवालात चुकीचे निकष लावून पात्र कुटुबियांची नावे प्रसिद्ध झालेल्या यादीत डावलण्यात आली आहे. पाहणीचे अनेक शासकीय सोपस्कार पूर्ण करत शेवटच्या क्षणी नावे अपात्र यादीत टाकल्याने अनेक वर्षांपासूनचे पक्के घराचे स्वप्न या हवेत विरले आहे.

कंधाणे गणातील पात्र लाभार्थ्यांच्या नावांचा पंतप्रधान आवास योजना (Prime Minister Housing Scheme) यादीत समावेश करावा, या मागणीचे निवेदन सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय बिरारी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक गटविकास अधिकारी हेमंत काथेपुरी यांना देण्यात आले.

Prime Ministers Housing Scheme
नाशिकमध्ये एक्स बँड डॉप्लर रडारसाठी पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांना साकडे 

२०२२ पर्यंत सर्व पात्र कुटुंबांना पक्के घर सुनिश्‍चित करून भारतातील ग्रामीण भागातील घरांची कमतरता दूर करून पीएमआययू मिशनअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना घर देण्याचा सरकारचा मानस आहे. या अंतर्गत कंधाणेतील संवर्गनिहाय (अ.जा.अ ज अल्पसंख्यांक व इतर) प्राधान्य यादीमधून पंतप्रधान आवास योजनेपासून ६२ पात्र कुटुंबातील लाभार्थ्यांना चुकीचे निकष लावून त्यांना पंतप्रधान आवास योजनेपासून वंचित ठेवण्यात आले. संबधित शासकीय यंत्रणेतील त्रुटी व चुकीच्या निकषांमुळे अनेक गरजू व पात्र लाभार्थी या यादीमधून वगळण्यात आले आहेत.

Prime Ministers Housing Scheme
नाशिक काँग्रेसकडून जोरदार घोषणाबाजी 'मोदी' यांच्या वक्तव्याचा निषेध

यात अनेक कुटुंब अठराविश्‍व दारिद्रय भोगत असताना व त्यांच्या नावावर कोणतेही पक्के घर नसताना संबधित शासकीय अधिकाऱ्यांकडून त्यांची नावे अपात्र करताना ‘पक्के घर’ असा शेरा मारून नाव डावलण्यात आले आहे. चुकीच्या निकषांमुळे अनेक नागरिकांचे पक्क्या घराचे स्वप्न भंगले असून, ‘कोणी घर देत का घर’ असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. संबधित अपात्र यादीतील कुटुंबाची योग्य ती चौकशी होवून त्यांची नावे पंतप्रधान आवास योजनेत समावेश करावी, अशी मागणी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय बिरारी, प्रमोद बिरारी, शशिकांत बिरारी यांनी श्री. काथेपुरी यांच्याकडे केली आहे.

Prime Ministers Housing Scheme
PM केअर्स योजनेला २८ पर्यंत मुदतवाढ

"कंधाणे गणातील अनेक पात्र लाभार्थी कुटुंबियांना चुकीचे निकष लावून त्यांची नावे पंतप्रधान आवास योजनेपासून वंचित ठेवली आहेत. संबधित शासकीय यंत्रणेने याची चौकशी करून या अपात्र कुटुंबांची नावे पात्र यादीत समावेश करावी."

- संजय बिरारी, संचालक, सटाणा बाजार समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.