Nashik : लाभार्थ्यांना मिळणार नियतनानुसार धान्य

Wheat
Wheatesakal
Updated on

मालेगाव (जि. नाशिक) : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या (Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana) अंत्योदय लाभार्थ्यांना मे महिन्याकरीता ९० टक्के तसेच प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांसाठी १०० टक्के गहु व तांदूळ वाटपासाठी प्राप्त झाला आहे. याअनुषंगाने शासनाच्या नियतनाप्रमाणे (determined) अंत्योदय व प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांना गहु (Wheat) व तांदळाचे (Rice) वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका धान्य वितरण अधिकारी दत्तात्रय शेजवळ यांनी कळविली आहे. (Beneficiaries will get foodgrains as per allotment Nashik News)

Wheat
Nashik : आरक्षण सोडतीत महिला राज, पहा कोणत्या प्रभागात काय सोडत

मालेगाव तालुक्यासाठी अंत्योदय लाभार्थ्यांना २० किलो गहु व १५ किलो तांदुळ तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रती व्यक्ती ३ किलो गहु व २ किलो तांदळाचे वाटप करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या मंजूर नियतनाप्रमाणे अंत्‍योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांचा तांदुळ गोदामात प्राप्त झाला नसल्याने स्वस्त धान्य दुकानदारांना उशिराने टप्याटप्याने मिळणार आहे. याबाबत कोणीही तक्रार करु नये. तसेच, अद्याप गोदामात साखर प्राप्त झाली नसल्याने मे महिन्यात साखर वाटप करण्यात येणार नाही. याबाबत कोणीही जनतेची दिशाभुल करुन अफवा पसरवू नये, असे आवाहनही श्री. शेजवळ यांनी केले आहे.

Wheat
Nashik : विहिरीत पडून बैलजोडीचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.