Durga Puja Utsav 2022 : गांधीनगरला दुर्गापूजा उत्सवाला सुरवात

decoration of the idol for the Durga Puja festival of Bengali people
decoration of the idol for the Durga Puja festival of Bengali peopleesakal
Updated on

नाशिक रोड : नाशिक- पुणे मार्गावरील गांधीनगर येथील बंगाली बांधवांच्या ६९ वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेला ऐतिहासिक दुर्गापूजा उत्सवाला सुरवात झाली असून देवीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी होत आहे. गांधीनगर येथे नवरात्रात दुर्गा उत्सव आणि रामलिला पाहण्यासाठी भाविक येत असतात.

बंगालमधील नदीतून आणलेली माती तसेच बांबू, गवत, वॉटर कलर यापासून देवीची मूर्ती गांधीनगरला बनवितात. माती आणून यंदा देवीची १४ फुटांची मूर्ती साकारली आहे. देवीशेजारी सरस्वती, लक्ष्मी, कार्तिक स्वामी, गणेश यांच्या मूर्ती आहेत. उत्सव समितीचे अध्यक्ष सुजाय गुप्ता, कार्यकारी उपाध्यक्ष पी. के. दास, प्रदीप बिस्वास, सरचिटणीस दीपक घोष, खजिनदार बिरू दास गुप्ता, महिला विभागाच्या अध्यक्षा डॉ. रिता कंडू, चिटणीस श्वेता गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम होत आहेत. (bengali people Durga Puja Utsav 2022 begins in Gandhinagar Nashik Latest Marathi News)

decoration of the idol for the Durga Puja festival of Bengali people
Dhule: महामार्ग गेले तर जिल्ह्यात उरेल काय? लोकप्रतिनिधींचा मंत्र्यांना प्रश्न

अशोक सरकार, आर. सी. नंदी, शिल्पा मुखर्जी, शिखा मंडल, गौरव घोष, अरुण सोनार, देबाशिष दास, सानंदा मित्रा, अंजू दास गुप्ता आदींची साथ त्यांना लाभत आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे देवीची मूर्ती पर्यावरणपूरक असते. दररोज भाविकांना महाप्रसादाचा लाभ दिला जात आहे. गांधीनगर प्रेसमध्ये आलेल्या भाविकांनी हा उत्सव सुरू केला असला तरी सर्व जाती- धर्माचे, प्रांताचे लोक या उत्सवाचा आनंद घेतात.

६९ वर्षांपूर्वी डॉ. जे. एम. मंडल व अन्य बंगाली बांधवांनी सुरू केलेल्या या उत्सवाचा परंपरा दुसरी पिढी पुढे नेत आहे. दरम्यान, कोरोना संकटामुळे दोन वर्ष पडलेल्या गांधीनगरच्या ऐतिहासिक रामलिलेला यंदा भाविकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. रामलीलेतील दृश्ये याची देही याची डोळा पाहण्यासाठी, ती मोबाईलमध्ये चित्रबद्ध करण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.

decoration of the idol for the Durga Puja festival of Bengali people
Dasara 2022 : दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर फुलबाजार तेजीत; झेंडू शंभरी गाठणार!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()