Primary Angioplasty in Myocardial Infarction : हृदयविकार रुग्णांना पामी तंत्रामुळे चांगले परिणाम

Heart Patients
Heart Patientsesakal
Updated on

नाशिक : एकीकडे जीवनशैली आणि आनुवंशिक कारणांमुळे हृदयविकाराचा झटका येणाऱ्या लोकांच्या संख्येमध्ये वाढ होत असताना प्रायमरी अँजिओप्लास्टी इन मायोकार्डिअल इनफार्क्शन (पामी) मुळे अधिक रुग्णांना चांगल्या परिणामांसह वाचविण्यात यश मिळत आहे. (Better Outcomes with the Primary Angioplasty in Myocardial Infarction Technique in Heart Disease Patients nashik news)

सह्याद्रि हॉस्पिटल नाशिक येथील डॉ. आशुतोष साहू म्हणाले, की हृदयविकाराचा झटका ही एक तातडीची आणि गंभीर स्थिती आहे व याच्या लक्षणांबाबत जागरूकता आणि किती लवकर आपण रुग्णाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकतो हे अतिशय महत्त्वाचे असते.

प्रत्येक मिनीट हा मोलाचा असतो आणि रुग्णाचे वाचणे याच्यावर अवलंबून असते.वेळेत हॉस्पिटलमध्ये घेऊन आणल्यास डॉक्टरांना तपासण्या व चाचण्या करून हृदयामधील रक्तप्रवाह पुन्हा सुरळीत करण्यासाठी प्रक्रिया लगेचच सुरू करता येते.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

Heart Patients
World Wetlands Day : नांदूरमध्यमेश्वरमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट

डॉ. हिरालाल पवार म्हणाले की, प्रायमरी अँजिओप्लास्टी इन मायोकार्डिअल इनफार्क्शन (पामी) यामुळे अनेक जणांचे जीव वाचविण्यात आणि हृदयाच्या स्नायूंचे पुढील नुकसान थांबविण्यास मदत होते. डॉ. आशुतोष शाहू पुढे म्हणाले की,सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने गेल्या वर्षी 71 पामी प्रक्रिया केल्या.त्यापैकी 70 जणांना वाचविण्यात यश आले.

सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सहाय्यक उपाध्यक्ष संजय चावला म्हणाले की, आमच्या येथे कॅथलॅब,अतिदक्षता विभाग,अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स व अद्ययावत वैद्यकीय उपकरणे यासह तज्ञ शल्यविशारद आणि भूलतज्ञ अशी प्रगत सुविधा आहे.

Heart Patients
ZP Sports Competition : जि. प. कर्मचाऱ्यांच्या स्पर्धांना प्रारंभ; 3 दिवस रंगणार थरार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.