Sakal Exclusive : New Pink Whatsapp Linkपासून सावधान ! ; Mobile Hacking साठी सायबर भामट्यांची शक्कल

Pink Whatsapp
Pink Whatsapp esakal
Updated on

Nashik News : सायबर गुन्हेगार नवनवीन शक्कल लढवून सर्वसामान्यांच्या जमापुंजीवर ऑनलाइन छापामारी करीत आर्थिक फसवणूक करीत असतात. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘न्यू पिंक व्हॉट्स‌ॲप’ लिंक सायबर भामट्यांकडून व्हायरल केली जात आहे.

या लिंकला ओपन केल्यानंतर गुलाबी रंगाचे व्हॉट्सॲप डाउनलोड करण्यास भाग पाडले जाते. हे पिंक व्हॉट्स‌ॲप डाउनलोड केल्यास त्यामुळे मोबाईल हॅक होऊन त्यातील गोपनीय माहिती सायबर भामट्यांच्या हाती लागून त्याआधारे फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Beware About New Pink Whatsapp Link for Mobile Hacking part of cyber fraud Nashik News)

त्यामुळे सोशल मीडियावर तुम्हाला न्यू पिंक व्हॉट्सॲप लिंक आली असेल, तर ती ओपन वा शेअर करू नका, अन्यथा फसवणूक होण्याची शक्यताच अधिक आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘न्यू पिंक व्हॉट्सॲप’ लिंक अनेकांच्या मोबाईलवर व्हायरल करण्यात येत आहे. सोशल मीडियावर सर्वाधिक प्रमाणात व्हॉट्स‌ॲप ही साइट वापरली जाते.

याच साइटच्या माध्यमातून अनेकजण एकमेकांच्या संपर्कात असतात. त्यात व्हॉट्सॲप व्यवस्थापनाने या साईटवरून आर्थिक व्यवहारांची देवाणघेवाणही सुरू केली आहे. त्यामुळे संवादासह आर्थिक व्यवहारही व्हॉट्स‌ॲपवरून होऊ लागले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Pink Whatsapp
Whats App : आता ChatGPT देणार तुमच्या व्हॉट्सअॅपवरील संदेशांना उत्तरे

सायबर भामट्यांनी यापूर्वीही व्हॉट्सॲपच्या माध्यमातून अनेकांना आर्थिक गंडा घातला आहे. व्हिडिओ कॉलकरून अश्लील संवाद, न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अनेकांकडून पैसे उकळलेले आहेत.

तसेच अनेकांना बक्षीस लागल्याची लिंक पाठवून त्यांची आर्थिक फसवणूकही केली आहे. या वेळी मात्र सायबर भामट्यांनी न्यू पिंक व्हॉट्सॲप या नावाची लिंक व्हॉट्सॲपवर व्हायरल केली. ही लिंक ओपन केल्यानंतर डाउनलोड ऑप्शन येते. ते डाउनलोड केल्यानंतर गुलाबी रंगाचे व्हॉट्स‌ॲपचे स्वतंत्र ॲप सुरू होते.

याच पिंक व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आपल्या मोबाईलमधील संपर्क क्रमांकांसह गोपनीय माहितीही या ॲपला लिंक होते. याच ॲपच्या आधारे संशयित सायबर भामटे आपल्या मोबाईल हॅक करून त्यातून गोपनीय माहिती चोरून घेतो.

त्याआधारे संशयित मोबाईलधारकाच्या आर्थिक व्यवहारांची माहिती घेऊन त्याद्वारे तुमचे बँक खाते रिकामे करू शकतो. त्यामुळे अशारीतीने सायबर गुन्हेगाराने मोबाईल हॅक करण्याची नवीन शक्कल लढविली असून, त्याद्वारे तुमची फसवणूक होऊ शकते. त्यासाठी सोशल मीडियावर येणारी कोणतीही लिंक डाउनलोड न करता स्वतःची फसवणूक होण्यापासून बचाव करू शकता.

Pink Whatsapp
What's appने तुमच्या खात्यावर निर्बंध लादले असतील तर काय कराल ?

‘व्हॉट्सॲप’ची ती लिंक नाही

नियमित व्हॉट्सॲपमध्ये काही बदल होत असेल तर ते यूजर्सने ॲप अपडेट केले की आपोआप त्यात बदल होतात. त्यात व्हॉट्सॲप नव्याने लिंक यूजर्सला पाठविणार नाही. त्यावरून न्यू पिंक व्हॉट्सॲप लिंक ही बोगस असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे व्हॉट्सॲप यूजर्सने या बाबत दक्षता बाळगावी आणि मूळ वा ओरिजनल ॲपशिवाय येणाऱ्या लिंक या व्हायरस वा फसवणुकीबाबत असण्याचीच शक्यता अधिक आहे.

"सध्या सोशल मीडियावर न्यू पिंक व्हॉट्सॲप या नावाने व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक मोठ्याप्रमाणात व्हारल होत आहे. अशी लिंक आपल्या ग्रुपवर आल्यास ती ओपन करू नका. हा एकप्रकारचा व्हॉट्सॲप व्हायरस असून, या लिंकला क्लिक केल्यास मोबाईल हॅक होऊन तुमची गोपनीय माहिती व बँकेचे तपशील हॅक होऊन त्याद्वारे सायबर गुन्हेगार आपली फसवणूक करू शकतो."

- प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, शहर गुन्हे शाखा

Pink Whatsapp
what's appवर तुम्हाला कोणी ब्लॉक केले आहे का, हे कसे ओळखाल ?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.