Nashik News : Social Mediaवरील Fake Messagesपासून सावधान; नाशिक शहर पोलिसांचे आवाहन

Social Media News
Social Media Newsesakal
Updated on

Nashik News : सोशल मीडियाच्या माध्यमातून शेकडो मेसेजेस फॉरवर्ड होत असतात. परंतु यामध्ये काही मेसेजेस हे समाजात अफवा पसरविण्याचे काम करीत असतात. तर काही मेसेजेस हे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा संदेश असलेले फॉरवर्ड केले जातात.

असाच एक मेसेज गेल्या काही दिवसांपासून अपहरणकर्त्यांपासून सावधगिरीचा एक संदेश मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे.

प्रत्यक्षात त्या नावाचा अधिकारीच मुंबई पोलिस दलात नसल्याने सदरील फेक मेसेजमुळे समाजात भीती पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही मेसेजेसची सत्यता पडताळावी आणि नंतरच त्यावर विश्‍वास ठेवावा असे आवाहन नाशिक शहर पोलिसांनी केले आहे.(Beware of fake messages on social media Appeal of Nashik City Police Be careful Nashik News)

सोशल मीडिया सर्वांसाठी व्यक्त होण्याचे एक साधन ऐवजी माध्यम झाले आहे. त्यामुळेच अल्पावधीमध्ये सोशल मीडियावर एखादा मेसेज व्हायरल झाला तर त्याच्या प्रतिक्रिया लगेचच उमटतात.

दररोज शेकडो मेसेजेस फॉरवर्ड होत असतात. या व्हायरल होणाऱ्या मेसेजेसमुळे बऱ्याचदा अनेकांना मदत होतेच. परंतु त्यातून नुकसान पोचण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. अनेकदा सायबर गुन्हेगारांकडूनही सोशल मीडियाचा वापर खुबीने केला जातो. तर कधी व्हायरल मेसेजेसमुळे समाजात भीतीही निर्माण होऊन पोलिस दलाचे काम वाढते.

काही महिन्यांपूर्वी, नाशिकमध्येच नव्हे तर राज्यभरात लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळ्या शहरात आल्याचे मेसेजस सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाले होते. यातून रस्त्यावर वस्तू विक्री, भंगार गोळा करणाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. एवढेच नव्हेतर काही ठिकाणी जमावाकडून काहींना मारहाणही झाली होती.

Social Media News
Nashik Agriculture News : कृषी अन्नप्रक्रिया निर्यातीत एप्रिलमध्ये 564 कोटींची घट

असा आहे ‘तो’ मेसेज

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आणखी एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या मेसेजद्वारे शहरातील निर्जनस्थळी, मॉलच्या पार्किंगमध्ये जर कोणी अनोळखी माणूस सुगंधी सेंटचा वास देण्याचा बहाणा करीत असेल तर वास घेऊ नका. नकार द्या. यातून अपहरण होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे सावधगिरी बाळगावी, असा मेसेज मुंबई शहर गुन्हेशाखेचे उपायुक्त के. आर. नागराजू यांच्या नावे व्हायरल करण्यात आलेला आहे. प्रत्यक्षात या नावाचा पोलिस अधिकारीच मुंबई पोलिस दलात नाही.

त्यामुळे सदरचा मेसेज फेक असून, या मेसेजद्वारे समाजात व नागरिकांमध्ये भीती पसरविण्याचा उद्देश काही भामट्यांचा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा मेसेजेसपासून नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन नाशिक शहर पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Social Media News
Nashik News : शहरात Triple Seat स्वार सुसाट; वाहतूक शाखेचा अघोषित परवाना?

भीती पसरविण्याचा उद्देश

समाज माध्यमांद्वारे वा सोशल मीडियाचा मुक्त वापर असल्याने त्याआधारे काही समाजकंटकांकडून फेक वा भीती पसरविणारे मेसेजेस व्हायरल केले जातात. यातून समाजामध्ये दुफळी माजून भीती पसरविण्याचा वा कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा उद्देश समाजकंटकांचा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वीही अनेकदा अशारीतीने प्रयत्न समाजकंटकांकडून करण्यात आलेले आहेत.

"सोशल मीडियावर व्हायरल होणारे मेसेजेस सर्वच खरे असतातच असे नाही. त्यामुळे संशयास्पद वाटणाऱ्या मेसेजेसबाबत खात्री करूनच त्यावर विश्‍वास ठेवावा. सोशल मीडियावरील मेसेजेसच्या माध्यमातून समाजात भीती पसरविण्याचीच शक्यता अधिक असते. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना सावधगिरी बाळगावी."

- प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, शहर गुन्हेशाखा.

Social Media News
Nashik News : शहरात Triple Seat स्वार सुसाट; वाहतूक शाखेचा अघोषित परवाना?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.