नाशिक : सध्या लग्नसराई सुरू आहे. शहरातील लॉन्सवर लग्नाच्या या धामधुमीमध्ये चोरटेही सक्रिय झाले आहेत. पंचवटीतील धनदाई लॉन्स येथे चोरट्याने साडेचार लाखांचे दागिने ठेवलेली पर्सच हातोहात लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Beware theft at wedding ceremonies in lawns Nashik Latest Crime News)
हेही वाचा : Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’
विजया नंदकुमार कुलथे (रा. वृंदावननगरी, सावतानगर, हिरावाडी, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, पंचवटीतील हनुमान वाडीमध्ये असलेल्या धनदाई लॉन्स येथे गेल्या सोमवारी (ता. ७) विवाह समारंभ होता. या सोहळ्यासाठी त्या उपस्थित होत्या. रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास त्यांनी लॉन्समधील एका खुर्चीवर पर्स ठेवली होती. अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून सदरील पर्स हातोहात लंपास केली.
या पर्समध्ये १५ हजार रुपयांचा मोबाईल, ५० हजारांची सोन्याची पोत, ६५ हजार रुपयांचे कानातील सोन्याचे जोड, ६५ हजारांच्या सोन्याच्या अंगठ्या, ९० हजार रुपयांचे सोन्याचे ब्रेसलेट, ९० हजारांचा सोन्याचा लक्ष्मीहार, ७० हजारांची रोकड, ८ हजारांचे चांदीचे पैंजन, चांदीचे जोडवे, घड्याळ असा ४ लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज होता. पर्स चोरीला गेल्याचे लक्षतात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धात्त घेतली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार शेळके हे तपास करीत आहेत.
सावधगिरी बाळगा
सध्या सर्वत्र लग्नसराईमुळे लॉन्सवर गर्दी असते. याठिकाणी आलेल्या महिलांच्या अंगावर आणि त्यांच्याकडील पर्समध्ये मौल्यवान दागदागिने असतात. ही बाब हेरून चोरटे लॉन्सवरील वरहाडी मंडळीमध्ये मिसळून हात की सफाई करीत मौल्यवान वस्तू लंपास करीत आहेत. त्यामुळे लग्नसराईसाठी आलेल्यांनी आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात. सावधगिरी बाळगण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.