Nashik News : भद्रकाली पोलिसांकडून संशयिकाकडून चोरीच्या 20 दुचाकी हस्तगत

Crime News
Crime Newsesakal
Updated on

जुने नाशिक : भद्रकाली गुन्हे शोध पथकाकडून दुचाकी चोरास ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीच्या २० दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. संशयित ' मास्टर की 'च्या साह्याने दुचाकी चोरी करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सिडको येथील सुमित पेंढारे यांची ५ डिसेंबर रोजी मेनरोड वावरे लेन येथून पार्क केलेली एम एच १५ डी क्यू ४१३० चोरी झाली होती. भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस कर्मचारी लक्ष्मण ठेपणे तपास करत होते. (Bhadrakali police seized 20 stolen bikes from the suspect nashik news)

Crime News
Nashik News : सर्पमित्र नितीन सोनवणे यांनी पकडला दुर्मिळ Black Cobra

दरम्यान भद्रकाली परिसरातून वारंवार दुचाकी चोरीस जाण्याच्या घटना घडत होत्या. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांनी दुचाकी चोरीचे ठिकाण (ब्लॅक स्पोट) निश्चित केले. गुन्हेशोध पथकाचे धनंजय हासे आणि सागर निकुंभ यांनी त्याठिकाणांची टेहाळनी करत त्याभागात वारंवार फिरस्ती करणारा संशयित हेमंत रमेश सोनवणे (वय.३५,रा.फोपीर तावडदेव फाटा तालुका सटाणा) यास ताब्यात घेतले.

त्याची कसून चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरीच्या घटनांची कबुली दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनात गुन्हेशोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर खांडवी, ज्ञानेश्वर मोहिते यांनी त्यांच्या पथकातील कर्मचारी रमेश कोळी, कय्युम सय्यद, लक्ष्मण ठेवणे, सागर निकम, धनंजय हासे, संदीप शेळके,विशाल काठे, संजय पोटिंदे, नितीन भामरे, लक्ष्मण ठेपणे यांनी विविध भागातून चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या. भद्रकाली पोलीस ठाण्यातील सहा, मुंबई नाका पोलीस ठाण्यातील एक, सटाणा पोलीस ठाण्यातील एक असे आठ गुन्हे उघडकीस आले आहे. एकूण २० दुचाकी जप्त केल्या आहे.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

Crime News
Nashik News : खबरदार! जनावरे मोकाट सोडाल तर...; मालकांवर होणार गुन्हे दाखल

मास्टर की चा वापर

संशयित त्याच्याकडे असलेल्या मास्टर की चा वापर करून दुचाकी चोरी करत असत. त्यानंतर त्यांच्या बनावट चावी बनवून. ग्रामीण भागात त्यांची विक्री करत असल्याची माहिती तपासात उघड झाले आहे. दुचाकी विक्रीसाठी कागदपत्र कसे उपलब्ध करत असत. आणखी गुन्हे केले आहेत का. गुन्हेगारी विश्वातील त्याची पार्श्वभूमी काय आहे. याची अधिक चौकशी पोलीस करत आहे. अशी माहिती श्री. चव्हाण यांनी दिली.

वेशभूषा बदलून कामगिरी

भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत वारंवार दुचाकी चोरीच्या घटना घडत होत्या. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त दिपाली खन्ना यांनी सर्व पोलीस ठाण्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार भद्रकाली गुन्हेशोध पथकाचे सागर निकुंभ धनंजय हासे यांनी विविध प्रकारच्या वेशभूषा बदलून दुचाकी चोरीच्या ठिकाणांची टेहाळनी करत होते. दरम्यान त्यांना संशयित हेमंत सोनवणे त्याठिकाणी संशयितरित्या फिरताना आढळून आला. दोघांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यात दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येऊन वीस दुचाकी मिळून आल्या.

Crime News
Nashik News : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले उद्यान; टवाळखोरांच्या जाचामुळे असूनही नसल्यासारखे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.