Nashik News : ‘आयुक्त’पदी असताना लोकोपयोगी कामे मार्गी : भाग्यश्री बानायत

IAS Bhagayshree Banayat
IAS Bhagayshree Banayatesakal
Updated on

Nashik News : महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या बदलीनंतर नवीन आयुक्तांची नियुक्ती होईपर्यंतच्या कार्यकाळात ‘आयुक्त’पदाचा कार्यभार सांभाळताना लोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेशी निगडित कामे मार्गी लावण्यास प्राधान्य दिले.

तसेच स्मार्टसिटीअंतर्गत ८०० मुलींना सायकलवाटप, ३०० दिव्यांगांचे प्रश्न सोडविले व सार्वजनिक बांधकाम विभागाला महापालिका हद्दित कामे करण्यासाठी १५० ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देऊन या प्रश्नांची सोडवणूक केल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त भाग्यश्री बानायत यांनी दिली.

विशेष म्हणजे, ‘सरकार आपल्या दारी’ या उपक्रमात दिलेल्या योगदानाबद्दल राज्य सरकारने नाशिक महापालिकेचे विशेष कौतुक देखील केले, असेही त्यांनी नमूद केले. (Bhagyashree Banayat statement During post of nmc commissioner public works carried out Nashik News)

बानायत म्हणाल्या, की शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याचे काम महापालिका करत असते. महापालिकेच्या प्रशासक म्हणून या प्रश्नांची सोडवणूक करण्यास प्राधान्य दिले.

यात पावसाळ्याच्या तोंडावर गटारींची साफसफाई, गोदावरी नदीकाठच्या व्यावसायिकांना पूराविषयी जाणीव करून देणे, कचऱ्याचे ढीग उभे राहिल्यास त्यातून आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात, असे सर्वसामान्य जनतेशी निगडित विषयांना प्राधान्य दिले.

केवळ जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक नव्हे, तर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या सेल्फी व बायोमेट्रिक हजेरीची समस्या सोडविली. ही व्यवस्था सुरळीत केल्यामुळे आता ‘सेल्फी’ व ‘बायोमेट्रिक’ हजेरीत सुसूत्रता आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

IAS Bhagayshree Banayat
NMC News: मोहिमेतून 5103 भूखंडांची दुहेरी कराच्या जाचातून सुटका

मध्यंतरी सिटीलिंक बसचालकांनी संप केला होता. हा प्रश्न तत्काळ सोडवून सिटीलिंक सुरळीतपणे सुरू केली. त्यामुळे महापालिका आयुक्त म्हणून कारभार सांभाळताना लोकाभिमुख कामांना प्राधान्य देण्याकडे कल ठेवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भूसंपादनाची प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यासारखी नसल्याने त्यांना प्राधान्य दिले नाही. त्यामुळे यातून वैयक्तिक प्रतिमा डागळण्याचे प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

"आयुक्तपदाचा कार्यभार असला तरी कामकाज माझ्या दालनातूनच केले. त्यामुळे माझ्याकडे येणाऱ्या सर्व फाइल्सची रितसर आवक-जावक रजिस्टरमध्ये नोंदणी होते. महापालिकेला प्राप्त होणाऱ्या अभिलेखांची नोंद झालेली असल्याने अनियमितता होण्याचा प्रश्नच उद्‍भवत नाही."

-भाग्यश्री बानायत, अतिरिक्त आयुक्त, नाशिक महापालिका

IAS Bhagayshree Banayat
NMC News: दीड महिन्यात मंजूर फायलींची यादी करा तयार; आयुक्त करंजकर यांच्या प्रशासनाला सूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.