नाट्य अभिनेते, निर्मात्यांना चांगले दिवस यावे : भरत जाधव

.
Actor Bharat Jadhav
Actor Bharat Jadhav esakal
Updated on

नाशिक : नाट्यक्षेत्रात अभिनेता प्रशांत दामले किंवा भरत जाधव यांच्या नाटकांचे प्रयोग व्हावे असे नाही तर महाराष्ट्रभर सर्व नाट्य अभिनेते, निर्मात्यांच्या नाटकांचे प्रयोग होत चांगले दिवस यायला हवे. यासाठी शंभर टक्के नाट्यक्षेत्र सुरू होण्याची गरज असल्याचे अभिनेता, निर्माते भरत जाधव (Bharat Jadhav) यांनी ‘सकाळ’ शी बोलताना स्पष्ट केले.

कोरोनानंतर (Corona) पहिल्यांदाच व्यावसायिक ‘सही रे सही’ नाटकाचा प्रयोग शनिवारी (ता.१३) कालिदास कलामंदिर येथे झाला. यानिमित्त नाशिकमध्ये आलेले भरत जाधव यांच्याशी संवाद साधला असता भरत जाधव म्हणाले, की कोरोनाकाळात पडद्यामागील कलाकारांच्या मदतीसाठी पुरेपूर प्रयत्न केला. नाट्यगृह सुरू करण्यासाठी उशीर झाला परंतु आता मागे न वळता यापुढील काळात निर्मात्यांचे धाडस यापुढे महत्त्वाचे ठरणार आहे. कोरोनात नाट्यक्षेत्र बंद असल्याने कलाकारांसह पडद्यामागील कलाकारांना फार मोठा फटका बसला आहे. नफा तोटा दूरची गोष्ट असून नाटक सुरू होणे आमच्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. कोरोनात पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकारांची भयानक परिस्थिती होती. पैसे मागायचे कुणाकडे असा प्रश्न पडला होता, अनेक जणांची मदत करून कलाकारांना त्या विंवचनेतून बाहेर काढले आहे. नाशिककरांनी ‘सही रे सही’, ‘मोरूची मावशी’ ‘ऑल द बेस्ट’ नाटकांना प्रतिसाद दिला आहे. कोरोनाची सर्व काळजी घेऊन प्रयोग सुरू झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.





Actor Bharat Jadhav
नाशिक : कंगना विरोधात दाखल होणार देशद्रोहा गुन्हा

या निर्णयाची आतुरतेने वाट पाहतोय

नाट्यगृहात वातानुकूलित यंत्रणेमुळे हवा आतल्या आत खेळती राहते. त्यामुळे कोरोना प्रसाराचा धोका संभावतो , असा तांत्रिक मुद्दा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मांडला होता. तो आम्हा सगळ्यांना पटला असल्याचे अभिनेता भरत जाधव यांनी नमूद केले. मुख्यमंत्री ठाकरे परिस्थिती बघून निर्णय घेणार असले तरी नाट्यगृह शंभर टक्के प्रेक्षक क्षमेतेने केव्हा सुरू होतील याची आतुरतेने वाट पाहतो आहे, असे अभिनेता भरत जाधव यांनी नमूद केले.



उठा आणि कामाला लागा

‘सही रे सही’, ‘मोरूची मावशी’ ‘ऑल द बेस्ट’ अशा नाटकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रेक्षकांनी कोरोनाची मरगळ दूर सारत ताजेतवाने होण्यासाठी नाटक पाहायला यावीत जेणेकरून नाट्यकर्मींना सुगीचे दिवस पुन्हा अनुभवास मिळतील. कोरोनामुळे लोकांमध्ये नैराश्याची भावना पसरली असून, नाटकांनी निखळ मनोरंजन होणार असून प्रेक्षकांसाठी उठा आणि कामाला लागा अशी वेळ आली असल्याचे अभिनेता भरत जाधव यांनी नमूद केले.

Actor Bharat Jadhav
नाशिक शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.