चांदोरी : चांदोरी येथील सुमारे सातशेहून अधिक महिलांनी बोटीने नदीत जात पाण्यातील मंदिरांच्या दर्शनाचा अनुभव घेतला. आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने बहिणींना दिवाळीचा आनंद वेगळ्या पद्धतीने मिळावा यासाठी चांदोरी नदीपात्रात असलेल्या मंदिरांचे बोटीद्वारे फिरून दर्शनाचा उपक्रम २७ व २८ ऑक्टोबरला राबवला.
ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभलेल्या चांदोरी येथे गोदावरी नदी चंद्रकार आकाराने प्रवाही होते. त्यामुळे गावाला चांदोरी नाव पडले. या गोदावरी नदीच्या काठावर हेमाडपंती तसेच वेगवेगळ्या कालखंडात मंदिरे बांधलेली आहे.(Bhaubeej Special Nashik Mahervashini visit to water temple Another disaster management initiative Nashik News)
नांदूरमध्यमेश्वर धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर चांदोरी येथील नदीकाठावरील मंदिरे पाण्याच्या फुगवट्यामुळे पाण्यात गेली. पाणी आटल्यानंतर शंभर वर्षात फक्त तीन ते चार वेळाच मंदिरात जाऊन दर्शनाची संधी परिसरातील नागरिकांना मिळाली आहे.
या पाण्यातील मंदिराच्या दर्शनाची ओढ कायम चांदोरीकरांना लागलेली असते. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कार्यकर्त्यांनी आगळीवेगळी दिवाळी व भाऊबीज साजरी करण्याचे ठरवले. त्यासाठी सिद्धार्थ वनारसे, सरपंच वैशाली चारोस्कर, अनिल गडाख आदींसह ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.
या मोहिमेत चांदोरी आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर गडाख, सोमनाथ कोटमे, योगेश जाधव, विलास सूर्यवंशी, डॉ. हेमंत सावंत, संजय जाधव, किरण वाघ, तुषार खरात, वैभव जमधडे, बाळू आंबेकर, विलास गांगुर्डे, फकिरा धुळे, डॉ. संजय भोज, केशव झुर्डे, ओम टर्ले, किसन जाधव, आकाश शेटे, सूरज पगारे, सचिन कांबळे, किरण भुरकुडे, गोपीनाथ टर्ले आदी सहभागी झाले होते.
"आपत्ती व्यवस्थापन समितीने राबविलेला हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे. गावची माहेरवाशीण असली तरी मंदिर जवळून बघता आले नव्हते, ती इच्छा पूर्ण झाली."
- सौ. दीपाली चौधरी, ओझर
"ऐतिहासिक महत्व असलेल्या चांदोरी गावची कन्या असल्याचा अभिमान असतांना मंदिर मात्र जवळून बघितले नव्हते, आज ऐतिहासिक ठेवा जवळून बघण्याचा आनंद काही औरच होता."
- सौ. रेखा जगताप, नाशिक
"आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये काम करताना उपलब्ध साहित्याचा वापर करत गावची माहिती भगिनींना व्हावी या हेतूने समिती अध्यक्ष सागर गडाख यांनी संकल्पना मांडली, सर्वांनी योगदान देत ७०० हून अधिक भगिनींनी मंदिरे बघितले."
- सोमनाथ कोटमे, सदस्य, आपत्ती व्यवस्थापन समिती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.