Bhaubij 2023: माहेवाशीनींनी बसस्‍थानके गजबजली, प्रवाशांची तुडूंब गर्दी! MSRTCतर्फे जादा बसगाड्यांची सुविधा

Crowd of passengers in the bus station
Crowd of passengers in the bus stationesakal
Updated on

Bhaubij 2023 : दिवाळी उत्‍सवात लक्ष्मीपूजनानंतर आता माहेरवाशीनींना माहेरचे वेध लागले आहे. आपल्‍या चिमुकल्‍यांसह घराकडे निघालेल्‍या महिला प्रवाशांनी शहरातील बसस्‍थानके गजबजली होती.

'मामाच्‍या गावाला जाऊया' असे म्हणताना बच्चे कंपनीमध्ये चांगला उत्‍साह पाहायला मिळाला.

प्रवाशांच्या सुविधेसाठी महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळातर्फे जादा बसगाड्यांची सुविधा उपलब्‍ध करून दिलेली आहे. (Bhaubij 2023 Mahevashini crowded bus stations passengers crowded Provision of additional buses by MSRTC nashik)

वर्षातील सर्वात मोठा सण असलेल्‍या दिवाळीनिमित्त सर्वत्र उत्‍साहाचे वातावरण बघायला मिळत आहे. गेल्‍या काही दिवसांपासून बसस्‍थानकांवर प्रवाशांची लक्षणीय गर्दी होते आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी महामंडळाच्‍या नाशिक विभागातर्फे जादा बसगाड्यांची व्‍यवस्‍था केली आहे.

लक्ष्मीपूजनाचा सोहळा पार पाडल्‍यानंतर आता महिला वर्गाला भाऊबीजेनिमित्त माहेरचे वेध लागले आहे. दिवाळीनिमित्त महामंडळातर्फे हंगामी भाडेवाढ केलेली असली तरी, महिलांना तिकिटात सवलत योजना लागू असल्‍याने महामंडळाच्‍या बसगाड्यांना प्राधान्‍य दिले जाते आहे.

सोमवारी (ता.१३) शहरातील नवीन सीबीएस, जुने सीबीएस तसेच महामार्ग बसस्‍थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली होती. नवीन सीबीएसवरुन धुळे, जळगावसह छत्रपती संभाजीनगर, पुणे या मार्गांवर अधिक प्रमाणात प्रवाशांची गर्दी बघायला मिळाली.

तर जुने सीबीएस येथून जिल्‍हांतर्गत सटाणा, कळवण, देवळ्यासह साक्री व नंदुरबारच्‍या गाड्यांना गर्दी होती. शहरात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत असल्‍याने या बसस्थानकावरून त्र्यंबकेश्‍वरला जाणाऱ्या बसगाड्यांमध्येही प्रवासी संख्या अधिक राहिली. तर महामार्गावरुन कसारा, मुंबईकडे जाणाऱ्या बसगाड्यांना चांगला प्रतिसाद मिळाला.

Crowd of passengers in the bus station
Diwali Padwa 2023: पाडव्याचा मुहूर्तावर शेकडो प्रकल्पांचे हस्तांतरण! शहराच्या बाह्य भागाला पसंती

एसटी महामंडळाच्‍या बसगाड्यांसोबत खासगी ट्रॅव्हल्सच्या बुकींगलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः लांब पल्‍याच्‍या गाड्यांकरिता तिकीट मिळविण्यासाठी प्रवाशांना चांगलीच कसरत करावी लागते आहे.

जिल्‍हाभरातून जादा बसगाड्या

शहरी बसस्‍थानकांप्रमाणे जिल्‍हाभरातील आगारांतून जादा बस फेऱ्यांचे नियोजन आखले आहे. त्‍यामुळे प्रवाशांची गैरसोय टळत आहे. पुढील काही दिवस वाढीव बस फेऱ्या सुरु राहणार आहेत. दिलेल्‍या प्रतिसादाबद्दल नाशिकचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी प्रवाशांचे आभार मानले आहेत.

Crowd of passengers in the bus station
Diwali 2023: दिल्ली, मुंबई अन् पुण्याची घुसमट; फटाक्यांमुळे आगी, भर दिवाळी सणात शहरांना काजळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.