ब्राह्मणगाव : आजच्या आधुनिक इंटरनेटच्या जगात संपूर्ण जग जवळ आले असली तरी माणूस माणसापासून अधिकच दुरावला आहे. इंटरनेटच्या जगात हजारो मित्रपरिवार, नातलग जवळ असताना देखील माणूस एकाकी पडत चालला आहे.
प्रत्यक्षात कुणीही, कुणाच्या सुखदुःखात प्रत्यक्ष सहभागी होत नाही. त्यामुळे नातेसंबंध असले तरी त्यातील गोडवा, जिव्हाळा, स्नेह, आपलेपणा नक्कीच कमी झाला आहे. प्रेम, जिव्हाळा, स्नेह, आपलेपणा विभक्त कुटुंबातील सदस्यांपुरता मर्यादित व तोकडा झाला आहे.
पुढच्या पिढीत आपोआपच मागील नातेवाईक दुरावले जात आहेत. अशा या आधुनिक काळात ब्राह्मणगावी अहिरे कुटुंबीयांनी नात्यातील ओलावा टिकण्यासाठी चार पिढीतील नातलगांनी एकत्र येत भाऊबीज साजरी करून त्यांनी समाजात आदर्श उभा केला आहे. (Bhaubij 2023 Siblings of 4 Generations 118 siblings of malji Ahire family of Brahmangaon came together nashik)
ब्राह्मणगाव येथील (कै) मालजी विठ्ठल अहिरे यांच्या कुटुंबीयांनी एकत्रित भाऊबीज साजरी करत तालुक्यात कौटुंबिक प्रेम, स्नेह जिव्हाळा यांचे अनोखे उदाहरण सादर केले आहे.
दिवंगत (कै) मालजी विठ्ठल अहिरे यांना नामदेव, लक्ष्मण, अमृत, बाजीराव व मधुकर अशी पाच मुले. पहिल्या पिढीतील आजोबा बाजीराव मालजी अहिरे व तीन आजी अंजना अमृत अहिरे, वत्सला मधुकर अहिरे, निर्मला बाजीराव अहिरे आज हयात आहेत.
यांच्या पुढील पिढीत सर्व मिळून ऐकून २२ बहीण भाऊ आहेत. दरवर्षी प्रत्येक आजोबाच्या कुटुंबातील नातलग एकत्रित भाऊ बहिणीच्या गोड नात्याला उजाळा देणारा दिवाळीतील भाऊबीज सण साजरा करत.
यंदा पणजोबाच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्रित भाऊबीज साजरी करावी असे पाचही कुटुंबातील प्रमुख कैलास अहिरे, केवळ अहिरे, रमेश अहिरे, दीपक अहिरे, संदीप अहिरे यांनी ठरवले. सर्वांचे मुले, मुली, जावई, सुना,नातवंडे यांना भाऊबिजेसाठी आमंत्रित करण्याचे ठरले.
श्री. अहिरे परिवारातील तरुणांनी हे शक्य करून दाखवले. ब्राह्मणगावी सुभाष अहिरे यांच्या शेतात सकाळी अकराच्या दरम्यान हा सामूहिक कौटुंबिक भाऊबीज कार्यक्रम पार पडला.
यात चार पिढीतील १४८ पैकी ११८ सदस्यांनी सहभागी होत भाऊबीज साजरी केली. उर्वरित सदस्य प्रकृती कारणाने सहभागी होऊ शकले नाहीत मात्र ऑनलाइन या सोहळ्याचे साक्षीदार झाले.
९० वर्षाच्या आजी अन अडीच वर्षांची पणती
अहिरे परिवाराच्या या भाऊबिजेला ९० वर्षीय आजी अंजनाताई अहिरे तर परिवारातील सर्वात लहान सदस्य अडीच वर्षाची पणती राजवी आई वडिलांसह उपस्थित होती. सामूहिक भाऊबीज, स्नेहभोजन, गप्पागोष्टी कार्यक्रम पार पडले.
अमेरिकेतून काश्मिरा विनय भामरे दोन्ही मुलांसहित तर नगर, रावेर, मुंबई, पुणे, नाशिक, चाळीसगाव, धुळे, मालेगाव, सटाणा व परिसरातील नातलग कार्यक्रमास उपस्थित होते.
एम. एम. पाटील व प्राध्यापिका विद्या पवार यांनी मनोगत व्यक्त केले. २२ भाऊ, बहिणी, मुले, मुली, नातवंडे मिळून ११८ सदस्यांनी ही अनोखी भाऊबीज साजरी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.