Nashik Rain Update: भावली धरण शंभर टक्के भरले! यंदाही मारली प्रथम बाजी

Bhavli dam in Igatpuri taluk has started overflowing after being filled to its full capacity on Monday (24th).
Bhavli dam in Igatpuri taluk has started overflowing after being filled to its full capacity on Monday (24th).esakal
Updated on

Nashik Rain Update : इगतपुरी तालुक्याची पिण्याच्या पाण्याची गरज भागविणाऱ्या व सिंचनाचे प्रश्न सोडविणारे भावली धरण आज पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले आहे.

दारणा नदीच्या उगमस्थानी असलेल्या एक हजार तीनशे एकोणपन्नास दशलक्ष घनफूट साठवण क्षमता असणारे हे धरण भरल्याच्या वृत्ताने संपूर्ण तालुका सुखावला आहे. (Bhavli Dam 100 percent full Nashik Rain Update)

तालुक्यात गेल्या सात आठ दिवसापासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्व धरणांच्या साठ्यात समाधानकारक वाढ झाली असून महत्त्वाचे समजले जाणारे दारणा धरणही भरण्याच्या मार्गावर आहे.

या धरणातून काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यामुळे येत्या चार पाच दिवस पावसाने मेहेरबानी कायम राहिल्यास दारणा धरण सुद्धा लवकरच भरेल अशी माहिती सेक्टर अभियंत्यांनी दिली.

तालुक्यात मागील सात आठ दिवसापासून सुरु झालेल्या पावसाने अद्यापही उसंत न दिल्याने धरण साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. संततधार पावसामुळे आतापर्यंत आबादानी झाली असून, यावर्षीही पाऊस शंभर टक्के सरासरी ओलांडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आज (ता.१५) पर्यंत १ हजार ९०१ मिलिमीटर पाऊस झाल्याने तालुक्यातील धरणसाठ्यात भरमसाट वाढ झाली आहे. यातील भावली धरण ओव्हर फ्लो झाले आहे. दरम्यान दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग आजही सुरुच आहे.

दारणा नदीच्या उगमस्थानी बांधण्यात आलेले भावली धरणातील पाणीसाठा दारणा धरणात सोडून पुढे नांदूरमध्यमेश्वरमार्गे जायकवाडीला सोडण्यात येतो. संपूर्ण तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची मदार या धरणावर आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Bhavli dam in Igatpuri taluk has started overflowing after being filled to its full capacity on Monday (24th).
Nashik: विद्यार्थ्यांची वर्षातून दोनदा होणार आरोग्य तपासणी! आदिवासी विकास आयुक्तालयाचा शासनाकडे प्रस्ताव

यामुळे मागील काही महिन्यात या धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग केल्याने या धरणाने तळ गाठला होता. दारणा नदीलगतच्या गावातील पिण्याच्या पाण्याची सिंचनाची भिस्त या धरणावर असल्याने सर्वजण हे धरण भरण्याच्या प्रतीक्षेत होते. भाम तसेच दारणा धरणही आता लवकरच भरण्याच्या मार्गावर आहे.

पंधरा दिवस आधीच बाजी

गेल्यावर्षी जुलै महिन्यातच धरण भरले होते. तर यावर्षी पंधरा दिवस अगोदरच हे धरण भरले आहे. यंदा उशिरा पाऊस सुरु होऊनही धरण लवकर भरल्याची किमया वरुणराजाने साधली.

यावरून या भागात पावसाचे प्रमाण किती असेल याचा अंदाज येतो. आता मात्र या भागातील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढणार आहे.

Bhavli dam in Igatpuri taluk has started overflowing after being filled to its full capacity on Monday (24th).
Nashik News: मोकाट जनावरांच्या त्रासाने वणीकर हैराण! भररस्त्यावर ठाण मांडून बसल्याने अपघातांत होतेय वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.