दारणासह नांदूरमध्यमेश्‍वर, भावलीतून विसर्ग सुरू

bhavali dam
bhavali damesakal
Updated on

नाशिक : मॉन्सून सक्रिय झाल्यानंतर सुरू असलेल्या वरुणराजाच्या हजेरीमुळे भावली अन् नांदूरमध्यमेश्‍वर धरण शंभर टक्के भरले आहे. दारणा धरण ७८ टक्के भरले असून, या धरणातील विसर्ग वाढवून तीन हजार १९६ क्यूसेक करण्यात आला आहे. तसेच नांदूरमध्यमेश्‍वरमधून एक हजार ६१४, तर भावलीतून १३५ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील मोठ्या सात आणि मध्यम १७, अशा एकूण २४ प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षी ३९ टक्के जलसाठा होता. तो आता ४२ टक्के झाला आहे. (Bhavli-Nandurmadhyameshwar-with-Darna-dam-water-marathi-news-jpd93)

धरणांमध्ये ४२ टक्के साठा; जिल्ह्यात ४४ टक्के पाऊस

नाशिक शहर आणि परिसरात पहाटे पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत. तसेच दिवसभर ढगाळ हवामान राहिले असून, सरी अधूनमधून कोसळत होत्या. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील साठा ६८ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. मालेगाव आणि खानदेशच्या पाण्याची गरज असलेल्या गिरणा धरणातील जलसाठा ३७ टक्के झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत ४४.०९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. आज सकाळी आठला संपलेल्या चोवीस तासांत झालेला पाऊस तालुकानिहाय मिलिमीटरमध्ये असा ः नाशिक- १८.६, इगतपुरी- ६२, दिंडोरी- २२, पेठ- ८२, त्र्यंबकेश्‍वर- ५७, मालेगाव- ७, कळवण- १५, बागलाण- १६.१, सुरगाणा- ७६.२, देवळा- ६.२, निफाड- १७.४, सिन्नर-१२, येवला- ४.२, नांदगाव- २, चांदवड- ५.९. पावसाच्या या नोंदीवरून जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याचे दिसून येत आहे.

bhavali dam
घरांना कड्या लावून सराफ बाजारात धाडसी घरफोडी! सुरक्षा ऐरणीवर

खरिपाच्या पिकांना मदत

पावसाने मेहेरबानी करण्यास सुरवात केल्याने खरिपाच्या पिकांना मदत होणार आहे. आदिवासी भागामध्ये सतत पाऊस सुरू राहिल्याने भाताच्या रोपांच्या पुनर्लागवडीला वेग येणार आहे. त्याचबरोबर खरिपाच्या उरलेल्या क्षेत्रावर पेरण्यांना वेग येईल. मागील आठवड्यापर्यंत खरिपाच्या पेरण्या ५० टक्क्यांपर्यंत झाल्या होत्या. पावसाची परिस्थिती पाहता, अजूनही पिण्याच्या पाण्याची वानवा असलेल्या भागात पावसाची गरज असल्याचे दिसून येते. आगामी काळात पाऊस राहिल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची समस्या काहीशी कमी होण्यास मदत होईल.

bhavali dam
नाशिककरांचे हक्काचे 400 दशलक्ष घनफूट पाणी वाया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.